Viral Video : उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) शहराला धर्मनगरी म्हणून ओळखलं जातं. मात्र काही जण इथं गंगा नदीत (Ganga River) बोटीवर बसून हुक्का ओढताना आणि मांसाहार करतानाचा व्हिडिओ (Video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
व्हायरल व्हिडिओत काही तरुण मुलं गंगा नदीत बोटीत बसून हुक्का आणि चिकन पार्टी करताना दिसत आहेत. तरुणांपैकीच एकाने मोबाईलमध्ये हा व्हिडिओ चित्रित केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दारागंज पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तपासात हा व्हिडीओ दारागंजचा असल्याचे आढळून आल्यास आरोपी तरुणांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात येईल, असं पोलिसांनीम म्हटलं आहे.
उत्तर प्रदेश के प्रयागराज जैसे तीर्थ स्थल पर की जा रही पार्टी जिसमे संगम नगरी प्रयागराज में गंगा जी में बीचों बीच नाव पर हुक्का पीते और चिकन पकाने का वीडियो हुआ वायरल। @IndianMayor #Prayagraj #GANGA #hukka #chicken #ViralVideo #UttarPradesh #uttarakhandnews pic.twitter.com/QvJoi6FKEr
— Indian Mayor (@IndianMayor) August 30, 2022
बोटीत बसलेले काही तरुण हुक्का पिताना दिसत आहेत, तर काही तरुण चिकन शिजवताना दिसत आहेत. मागे बसलेले तरुण मजा करत आहेत. बोटीवरील तरुण सेल्फीही घेत आहेत. गंगेत बोटीवर पार्टीचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी तीव्र आक्षेप नोंदवला.
याप्रकरणी दारागंज पोलीस ठाण्यात तक्रारही करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलीस व्हिडिओच्या आधारी तरुणांचा शोध घेत आहेत.