उत्तरप्रदेश : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते टोकियो ऑलिम्पिकमध्ये मेडल पटकावणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. लखनऊमधल्या अटल बिहारी वाजपेयी स्टेडिअमवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य कार्यक्रमात ऑलिम्पिक मेडल विजेत्या खेळाडूंना रोख पुरस्काराने गौरवण्यात आलं.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत भारताला गोल्ड मेडल पटकावून देणाऱ्या नीरज चोप्राला सर्वाधिक 2 कोटी रुपयांचं बक्षिस देण्यात आलं. तर ब्राँझ मेडल विजेत्या हॉकी टीममधल्या प्रत्येक खेळाडूला 1 कोटी रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली. मेजर ध्यानचंद यांच्या नावाने मेरठमध्ये क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. त्याचबरोबर दोन खेळांसाठी पुढील दहा वर्ष सर्व खर्च राज्य सरकार उचलण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. यात कुस्ती या खेळाचा समावेश असेल. लखनऊमध्ये कुस्ती अकादमीची स्थापनाही करण्यात येणार आहे.
ऑलिम्पिकच्या इतिहासात भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नीरज चोप्रा - दोन करोड रुपये
रविकुमार दहिया - दिड करोड रुपये
मीराबाई चानू - दिड करोड रुपये
पी व्ही सिंधू - एक करोड रुपये
बजरंग पूनिया - एक करोड रुपये
पुरुष हॉकी टीम - प्रत्येकी एक करोड रुपये
महिला हॉकी टीम - प्रत्येक 50 लाख रुपये
दीपक पूनिया - 50 लाख रुपये
आदिती अशोक - 50 लाख रुपये
हॉकी टीम स्टाफ - 10 लाख रुपये