लखनऊ : रासायनिक कारखान्यात बॉयलरचा भीषण स्फोट झाला आहे. या स्फोटात दुर्देवाने 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 15 हून अधिक जण जखमी झाले. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे. तसेच मृतांच्या आणि जखमींच्या आकड्यात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्यांनी या घटनेबाबत ट्विटद्वारे शोक व्यक्त केला आहे. (uttar pradesh blast in a boiler chemical factory in Hapur district 8 deaths and 15 injured)
उत्तर प्रदेशातील हापूरमधील कृष्णा ऑरगॅनिक कंपनीमध्ये हा प्रकार घडला आहे. हापूरच्या धौलाना औद्यगिक वसाहतीच्या (UPSIC) हद्दीत हा स्फोट झाला. मेरठ झोनचे पोलिस महानिरीक्षक प्रवीण कुमार यांनी मृतांच्या आकड्याबाबत माहिती दिली.
हा स्फोट इतका जोरदार होता की आजूबाजूच्या अनेक कारखान्यांचे छत उडाले, अशी माहिती ही प्रत्यक्षदर्शींनी दिली. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हापूरच्या धौलाना पोलीस स्टेशन हद्दीतील यूपीएसआयडीसीमधील सीएनजी पंपाच्या मागील कृष्णा ऑरगॅनिक कंपनीमध्ये शनिवारी बॉयलरचा स्फोट झाला, त्यामुळे तेथे आग लागली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर या घटनेबद्दल शोक व्यक्त केला. योगींनी प्रार्थना करत शोकसंतप्त कुटुंबांप्रती शोक व्यक्त केला. योगींनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य करण्याचे आणि कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
Uttar Pradesh | A blast happened in a boiler in a chemical factory in Hapur district. Multiple fire tenders at the spot. pic.twitter.com/WUGwiRKuvn
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 4, 2022