नवी दिल्ली : लोकसभा निवडणुक २०१९ च्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. एकूण ७ टप्प्यात निवडणुका पार पाडण्यात येणार आहेत. ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. जर तुमचे वय १८ वर्षांपेक्षा अधिक आहे. तर तुम्ही मतदान करू शकता. त्यासाठी तुमचे नाव मतदान यादीत असणे अनिवार्य आहे. मतदान ओळखपत्रामध्ये तुमचे नाव, घराचा पत्ता आणि फोटो असतो. कोणतेही काम असले की निवडणुक कार्डची छायाप्रत मागितली जाते. अगदी छोट्या-छोट्या कार्यालयीन कामासाठी मतदान ओळखपत्राची गरज भासते. जर तुम्हाला तुमच्या मतदान ओळखपत्रामध्ये बदल करायचे असतील तर तुम्ही ते घर बसल्याही करू शकता.
जर तुम्हाला घराचा पत्ता बदलायचा असल्यास काय कराल
नॅशनल वोटर्स सर्विसच्या अधिकृत संकेतस्थळ www.nvsp.in ला भेट द्या. त्यानंतर correction of entries in electoral roll दिसेल. यावर क्लिक केल्यानंतर पत्ता बदलण्याचा पर्याय दिसेल. पत्त्यामध्ये बदल करण्यासाठी आधार कार्ड, बँक पासबुक, वाहन परवाना, पासपोर्ट यांसारख्या शासकीय कागदपत्रांची छायाप्रत मागितली जाते. अपडेट झाल्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक मागितला जाईल. संपूर्ण चौकशी झाल्यानंतर तुमचा नवीन मतदान ओळखपत्र तुमच्या राहत्या घरात पोहोचवला जाईल.
कसा बदलणार तुमचा फोटो
नॅशनल वोटर्स सर्विसच्या अधिकृत संकेतस्थळ www.nvsp.in ला भेट द्या. ८ नंबरचा अर्ज पूर्ण भरा. यावर क्लिक केल्यानंतर फोटो बदलण्याचा पर्याय दिसेल. ऑनलाईन चौकशी झाल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि ई-आईडी मागीतले जाईल. चार आठवड्यांच्या आत तुमच्या फोटोमध्ये बदल होतील.