भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर, पक्षाकडून कारवाईचे संकेत

भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर दिसून आले. एवढ्यावर न थांबता त्यांनी आपल्याच सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला. 

ANI | Updated: Jan 19, 2019, 05:34 PM IST
भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर, पक्षाकडून कारवाईचे संकेत title=

कोलकाता : भाजप खासदार विरोधकांच्या व्यासपीठावर दिसून आले. केवळ त्यांची उपस्थिती नजरेत भरणारी नव्हती तर त्यांनी आपल्याच सरकावर जोरदार हल्लाबोल चढवला. त्यामुळे भाजपकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत जाहीर सभांमधून विरोधात बोलण्यात येत होते. त्याकडे भाजपने दुर्लक्ष केले. मात्र, आता विरोधकांच्या गोठात जावून तेही त्यांच्या समवेत व्यासपीठावर बसत भाजपवर टीका केल्याने पक्षाने याची दखल घेतली आहे. त्यामुळे या भाजप खासदारावर काय कारवाई होते, याची उत्सुकता आहे.

मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचा विरोधकांचा निर्धार

 नरेंद्र मोदी, अमित शाह टीकेचे लक्ष्य

भाजपमध्ये असूनही विरोधकांसोमत या सभेत खासदार शत्रुघ्न सिन्हा सहभागी झाल्याने आणि मंचावरून भाषण दिल्याने अनेकांच्या भुवया उचावल्या होत्या. सिन्हा यांना त्याची कल्पना असल्याने त्यांनी भाषणामध्ये ते इथे का आले त्याचा खुलासा केला. मी भाजपमध्ये असलो तरी मी जनतेच्या बाजूने आहे आणि मी माझ्या पक्षाला आरसा दाखवण्याचे काम करतो असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सिन्हा यांनी मंचावर उपस्थित असलेल्या सगळ्या विरोधकांचे तोंडभरून कौतुक केले. भाजपचे खासदार असतानाही पक्षाच्या नेत्यांना आणि खासकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणालेत, व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा आहे.

तोपर्यंत लोक असेच म्हणणार...

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर भाष्य केले. चौकीदार चौर है, हे राहुल गांधी नेहमी म्हणत आलेत. त्यावेळ सिन्हा म्हणालेत, जोपर्यंत तुम्ही खरी उत्तरे दडवून ठेवण्याचा प्रयत्न कराल तोपर्यंत तुम्हाला जनतेकडून ‘चौकीदार चोर है’ असेच ऐकावेच लागेल. यावेळी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. एका बाजूला नोटाबंदी आणि दुसऱ्या बाजूला जीएसटी हे म्हणजे कडुलिंबावर कारले अशी परिस्थिती झाली आहे.

भाजपकडून कारवाईची शक्यता

मोदी सरकारविरोधात बोलणारे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा हे कोलकातामध्ये विरोधकांच्या सभेला उपस्थित राहिल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. शत्रुघ्न सिन्हा हे संधीसाधू असल्याची टीका भाजप नेते राजीव प्रताप रूडी यांनी केली आहे. काही लोकांच्या इच्छा मोठ्या असतात असे म्हणत रुडी यांनी सिन्हा यांच्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत.