Good News: सरकारी बँकेकडून दोन नव्या डिपॉझिट स्किम लाँच, व्याजदर जास्त असल्याने होणार फायदा

Fixed Deposite Interest Rate: लोकं आपल्या आयुष्यभराची पुंजी भविष्याच्या दृष्टीकोनातून बचत करून ठेवतात. कारण भविष्यात कोणती अडचण आली तर या रक्कमेचा वापर करता येईल. यासाठी लोकं फिक्स्ड डिपॉजिटला प्राधान्य देतात.

Updated: Nov 13, 2022, 04:57 PM IST
Good News: सरकारी बँकेकडून दोन नव्या डिपॉझिट स्किम लाँच, व्याजदर जास्त असल्याने होणार फायदा title=

Fixed Deposite Interest Rate: लोकं आपल्या आयुष्यभराची पुंजी भविष्याच्या दृष्टीकोनातून बचत करून ठेवतात. कारण भविष्यात कोणती अडचण आली तर या रक्कमेचा वापर करता येईल. यासाठी लोकं फिक्स्ड डिपॉजिटला प्राधान्य देतात. आता यूको या सरकारी बँकेनं अशा खातेदारांसाठी दोन फिक्स्ड डिपॉझिट स्किम लाँच केल्या आहेत. यूको 444 आणि यूको 666 या स्किम लाँच केल्या आहेत. ही स्किम 31 डिसेंबरपर्यंत असणार आहे. या योजनेंतर्गत कमीत कमी 10 हजार रुपये जमा केले जाऊ शकतात. त्यानंतर 1000 रुपयांच्या पटीने गुंतवणूक करू शकता. जास्तीत जास्त दोन कोटी गुंतवू शकता. दुसरीकडे बँकेनं 2 कोटी रुपयांच्या खाली असलेल्या एफडीच्या व्याजदरात 47 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. बँकेच्या वेबसाइटनुसार, नवीन दर 8 नोव्हेंबर 2022 पासून लागू झाले आहेत.

UCO 444 Fixed Deposit Scheme: यूको बँकेच्या UCO 444 ठेव योजनेत, सामान्य नागरिकांना 6.15% व्याज मिळेल तर ज्येष्ठ नागरिकांना 6.65% परतावा मिळेल. ही योजना 444 दिवसांची आहे. या योजनेत ठेवींवर ओव्हरड्राफ्ट आणि कर्ज घेण्याची सुविधा आहे. कर्मचारी, माजी कर्मचारी यांना 1% अधिक व्याज मिळेल तर माजी कर्मचारी ज्येष्ठ नागरिकांना 1.50% अतिरिक्त व्याज मिळेल.

UCO 666 Fixed Deposit Scheme: यूको 666 एफडी योजनेत, सामान्य नागरिकांना 6.25% आणि ज्येष्ठ नागरिकांना 6.75% व्याज दिले जात आहे. या योजनेत किमान 10,000 रुपये आणि कमाल 2 कोटी रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा करता येईल.

Personal Loan घेण्याच्या विचारात आहात? फायदे आणि तोटे समजून घ्या, नाही तर...

यूको बँकेच्या वेबसाइटनुसार, बँकेने 7 दिवस ते 29 दिवसांत मॅच्योरिटीवर 35 bps व्याजदर 2.55% वरून 2.90% पर्यंत वाढवला ​​आहे30-45 दिवसांत मॅच्योर होणाऱ्या मुदत ठेवींवरील व्याजदर 2.80% वरून 3.00% पर्यंत 20 bps ने वाढवला आहे. बँक आता 46-90 दिवसांत मॅच्योर होणाऱ्या एफडीवर 3.50% व्याजदर देत आहे. 91-180 दिवसांत मॅच्योर होणाऱ्या एफडीवरील व्याजदर 3.70% वरून 3.75% पर्यंत 5 bps ने वाढवला आहे.