Gold : सोन्याची शुद्धता कशी ओळखायची?

24, 22 आणि 18 कॅरेट म्हणजे काय?

Updated: Nov 13, 2022, 04:40 PM IST
Gold : सोन्याची शुद्धता कशी ओळखायची? title=
(फोटो सौजन्य - Pixabay)

सध्या लग्नाचा (marriage) हंगाम सुरु झालाय. त्यामुळे लगीन घाई असणाऱ्यांनी खरेदीला सुरुवात केलीय. अशातच सोने (Gold) खरेदीसाठीही लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केलीय. मात्र अनेकांना आपण घेतोय ते सोने किती शुद्ध ( gold purity) आहे याबद्दल माहिती नसते. फक्त 24 कॅरेट आणि 18 कॅरेट याबद्दलच लोक लोक ऐकून असतात. मग सोन्याची शुद्धता ओळखाची कशी? जाणून घ्या...

सोन्याची शुद्धता कशी ओळखली जाते?

सोन्याचे दागिने (gold ornaments) शुद्ध आहेत की नाही हे मोजण्याचा एक पर्याय आहे. दागिन्यांची शुद्धता हॉलमार्क (hallmark) चिन्हांद्वारे ओळखली जाऊ शकते. सोने हे एका कॅरेटपासून ते 24 कॅरेटपर्यंत असते. 

पण हे कॅरेट (gold karat) म्हणजे काय?

कोणत्याही सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता मोजण्यासाठी कॅरेट या मापकाचा वापर केला जातो. 22 कॅरेट सोने हे दागिने बनवण्यासाठी वापरले जाते. त्यावर 916 लिहिलेले असते. 24 कॅरेट सोने हे शुद्ध सोने मानले जाते. त्यावर 999 असे लिहिलेले असते.

21 कॅरेटच्या दागिन्यांवर 875 लिहिलेले असते. तर 18 कॅरेटच्या दागिन्यांवर 750 लिहिलेले असते. जर 14 कॅरेटचे दागिने असतील तर त्यावर 585 लिहिले जाते.

24 आणि 18 कॅरेटमध्ये काय फरक आहे? 

22 कॅरेट सोन्यामध्ये 91.67 टक्के शुद्ध सोने असते, तर  8.33 टक्के इतर धातू मिसळलेला असतो.  21 कॅरेट सोन्यात 87.5 टक्के शुद्ध सोने असते. 18 कॅरेट सोन्यात 75 टक्के शुद्ध सोने असते आणि 14 कॅरेट सोन्यात 58.5 टक्के शुद्ध सोने असते.

सणांच्या काळात सोने महाग का आहे? 

सणासुदीमुळे सोन्याची मागणी वाढते. यासोबतच भारतात कोरोनाचा प्रादृर्भाव कमी झाल्यापासून सोन्याच्या खरेदीत वाढ झाली आहे. त्यामुळे मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ झालीय.