उबेर ड्रायव्हरने तरूणीला लॉक करून केली छेडछाड

उबेरचा प्रवास किती ही सोईस्कर वाटला तरीही तो थोडा घातक आहे. 

Dakshata Thasale Updated: Mar 13, 2018, 11:20 AM IST
उबेर ड्रायव्हरने तरूणीला लॉक करून केली छेडछाड  title=

मुंबई : उबेरचा प्रवास किती ही सोईस्कर वाटला तरीही तो थोडा घातक आहे. 

राजधानी दिल्लीत महेंद्र पार्क येथे पोलिसांनी उबेर चालकाला अटक केली आहे. तरूणीचे अपहरण करून तिची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी या उबेर चालकाला अटक केली आहे. 9 मार्च रोजी उबेर कॅब बुक केलेल्या तरूणीला घरी सोडताना तिची छेडछाड करून कारमध्ये बंद केलं होतं. 

कुठे घडला हा प्रकार? 

भरपूर प्रयत्न करून त्या तरूणीने कारचा दरवाजा उघडून तिने पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उबेर चालक हा गांधीनगर, हरियाणाचा राहणारा संजय उर्फ संजू आहे. या पीडित तरूणीने ऑफिसमधून घरी जाण्यासाठी कार बुक केली. या कारचा नंबर कर्मशिअल नसून कारला काळ्या काचा होत्या. 

तरूणीने अशी केली सुटका?

त्या तरूणीला हा प्रकार विचित्र असल्याचं जाणवल्यावर तिने उबेर अॅपमध्ये कार चालकाचा फोटो तपासला तर तो चालक नव्हता. कार चालक सतत काचेतून तरूणीला पाहत होता. दारू प्यायलेल्या या चालकाने दुसरा रूट घरी जाण्यासाठी फकडला. तेव्हा तरूणीने विरोध केल्यावर तिला जिवे मारण्याची धमकी चालकाने दिली. आणि तिच्याशी छेडछाड करायला सुरूवात केली.