श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील शोपिंया जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात शनिवारी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षादलाला यश आले आहे. शोपिंया जिल्ह्यातील भागात दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षादलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे शोधमोहिम सुरू करण्यात आली होती.
सुरक्षादलाला शोपिंयातील इमाम साहिब भागात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली होती. सुरक्षादलाकडून शोधमोहिम सुरू करण्यात आली. शोधमोहिम सुरू करण्यात आल्यानंतर अचानक दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू करण्यात आला. त्यानंतर दोन्ही बाजूने गोळीबार करण्यास सुरूवात झाली. या गोळीबारात सुरक्षारक्षकांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले. या भागातील इतरही काही ठिकाणी दहशतवादी लपले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे.
Jammu & Kashmir: Two terrorists killed in exchange of fire between terrorists and security forces in Imam Sahib area of Shopian district. pic.twitter.com/ISv9nYQF0w
— ANI (@ANI) April 6, 2019
याआधी पुलवामा जिल्ह्यात या आठवड्यात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा ठार करण्यात आले होते. याच चकमकीत सेनेचे ३ जवान आणि एक पोलीस अधिकारी जखमी झाला होता. गेल्या आठवड्यात शोपिंया जिल्ह्यात सीआरपीएफ, सेना आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या शोधमोहिेमेत ३ दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.