विधवा महिलेवर लैंगिक संबंधासाठी दबाव, दोन प्राध्यपकांविरोधात गुन्हा दाखल

छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांविरोधात छेडाछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Dec 18, 2017, 11:06 PM IST
विधवा महिलेवर लैंगिक संबंधासाठी दबाव, दोन प्राध्यपकांविरोधात गुन्हा दाखल title=
Representative Image

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील बिलासपूर येथील एका महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांविरोधात छेडाछाड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या दोन प्राध्यपकांविरोधात त्यांच्याच महाविद्यालयातील एका महिला सहयोगीने गुन्हा दाखल केला आहे. 

याप्रकरणी पोलीस अधिक्षक शलभ सिन्हा यांनी सांगितले की, पंतप्रधान कार्यालय (पीएमओ)ने बिलासपूर पोलिसांना या प्रकरणी एक पत्र पाठवले असून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. 

बिलासपूर येथील के डी पी विप्रा महाविद्यालयात प्राध्यापक असलेले सुबीर सेन आणि शरण चंद्रा यांच्याविरोधात छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉलेजच्या दोन शिक्षकांकडून लैंगिक संबंधांसाठी दबाव टाकला जात होता मात्र, मी त्याला विरोधा केला असे पीडिताने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. 

आरोपींनी माझी छेड काढली आणि त्यासोबतच आक्षेपार्ह भाषेचाही वापर केल्याचंही पीडित महिलेने म्हटलयं. 

पोलीस अधिक्षक शलभ सिन्हा यांनी सांगितले की, महिलेच्या तक्रारीनंतर एका एनजीओने पीएमओला पत्र लिहीत या घटनेची माहिती कळवली. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयाकडून पोलिसांना ११ डिसेंबर रोजी एक पत्र आलं. या पत्रात योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. मात्र, अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाहीये.