मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बोर्ड लावणाऱ्या दोघांचा मृत्यू

तामिळनाडूच्या सीमापर्वर्ती अमापेट्टाई येथे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या दौऱ्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले दोघोजण हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बोर्ड लावल होते.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Aug 20, 2017, 05:14 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बोर्ड लावणाऱ्या दोघांचा मृत्यू title=

तंजावूर : तामिळनाडूच्या सीमापर्वर्ती अमापेट्टाई येथे मुख्यमंत्री के पलानीस्वामी यांच्या दौऱ्यापूर्वी दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू पावलेले दोघोजण हे मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचा बोर्ड लावल होते.

प्राप्त माहितीनुसार, बोर्ड लावत असताना बोर्डचा विजेच्या तारांशी संपर्क आला. त्यामुळे हा बोर्ड पकडलेल्या दोघांनाही विजेच्या उच्च दाबाचा धक्का बसून जागेवरच मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात घबराटीचे आणि गोंधळाचे वातवरण निर्माण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मणियारसन(२६), कर्णन (४६) आणि सत्यराज (२२) हे बोर्ड लावत होते. दरम्यान, बोर्डची फ्रेम तारांना चिकटली यात मणियारसन आणि कर्णन या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर, सत्यराज हा गंभीर जखमी झाला. जखमी सत्यराजवर तंजावूरच्या मोडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.