पाच वर्षात देशात ५८६ रेल्वे अपघात

गेल्या पाच वर्षात देशात तब्बल ५८६ रेल्वे अपघात झालेत. यापैकी तब्बल ५३ टक्के अपघात हे रेल्वे रुळावरुन घसरल्याने झालेत. 

Updated: Aug 20, 2017, 04:50 PM IST
पाच वर्षात देशात ५८६ रेल्वे अपघात title=

नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात देशात तब्बल ५८६ रेल्वे अपघात झालेत. यापैकी तब्बल ५३ टक्के अपघात हे रेल्वे रुळावरुन घसरल्याने झालेत. 

रेल्वेकडून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी मात्र अशा घटना घडतच आहेत. शनिवारी सायंकाळी मुझ्झफरनगरजवळ उत्कल एक्सप्रेसचे १४ डबे रुळावरुन घसरल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात २० प्रवाशांचा मृत्यू झाला तर ९२ जखमी झाले. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षात देशांत विविध ठिकाणी ५८६ रेल्वे अपघात झाले. यातील  ५३ टक्के अपघात हे रेल्वे रुळावरुन घसरल्याने झालेत. 

नोव्हेंबर २०१४पासून लहानमोठ्या घटनांसह २० अपघातांच्या घटना घडल्यात. २० नोव्हेंबर २०१६मध्ये इंदूर-पटना एक्सप्रेसला झालेला अपघात हा सर्वात भयंकर होता. यात १५० जणांचा मृत्यू झाला तर १५०हून अधिक जण जखमी झाले होते. 

२५ मे २०१५मध्ये रौकेला - जम्मू तावीमुरील एक्सप्रेला अघात झाला होता. यात रेल्वेचे आठ डबे रुळावरुन घसरले होते. यात ५ प्रवाशांचा मृत्यू तर ५० जखमी झाले. 

२० मार्च २०१५मध्ये डेहराडून-वाराणसी जनता एक्सप्रेसला रायबरेली येथे अपघाता झाला होता. यात ५८ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला तर १५०हून अधिक जखमी झाले होते. 

१३ फेब्रुवारी २०१५मध्ये बंगळूरु - एर्नाकुलम इंटरसिटी एक्सप्रेससचे नऊ डबे घसरल्याने झालेल्या अपघातात १० जणांचा मृत्यू तर १५०हून अधिक जखमी झाले होते.