Indigo Air Hostess Passenger Fight Viral Video : सोशल मीडियावर (Social media) रोज प्रत्येक क्षणा क्षणाला कुठल्या ना कुठल्या व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होतं असतो. विमानातील अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिले आहेत. काही व्हिडिओ हे फार मजेदार असतात. तर काही व्हिडिओ धक्कादायक (Shocking Video) असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस (Air Hostess Viral Video) एका प्रवाश्यावर चिडलेली दिसतं आहे. चला जाणून घेऊयात नेमकं काय घडलं ते...
एक मिनिटाचा या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस आणि प्रवासीमध्ये वादावादी सुरु आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता प्रवासी म्हणतोय की, तुम्ही माझ्यावर का ओरडत आहेत? त्यावर ती एअर होस्टेस म्हणाली की, तुम्ही आमच्यावर ओरडत आहात. या चिडलेल्या एअर होस्टेसला इतर सहकारी शांत करताना दिसतं आहे. पण ती त्या प्रवाशांवर चांगलीच भडकली होती. (Trending video Indigo Flight air hostess passenger fight You will be shocked to hear the reason)
ही एअर होस्टेस म्हणताना दिसतं आहे की, तुम्ही माझ्या क्रूशा असं बोलू शकतं नाही. तुम्ही आमच्या क्रूचा आदर केला पाहिजे. प्रवाशाने एअर होस्टेसला विचारले की, तिने तिच्या क्रूचा अपमान कसा केला? यावर एअर होस्टेस म्हणाली की, तिच्या क्रूकला तुम्ही बोट दाखवत. हे ऐकून प्रवाशाने एअर होस्टेसला 'शट अप' म्हणाला. यानंतर एअर होस्टेसही प्रवाशाला 'यू शट अप' असं म्हटलं...हा सगळ्या प्रकार विमानातील दुसऱ्या प्रवाशाने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला.
फ्लाइटमध्ये देण्यात आलेल्या जेवणावरून हा वाद सुरु झाल्याचं काही जण म्हणतं आहेत. त्यात भर पडली ती प्रवाशाने एअर होस्टेसला नोकर म्हटल्याने प्रकरण अजून चिघळलं. या व्हिडिओमध्ये एअर होस्टेस म्हणताना दिसतं आहे की, ''मी एक कर्मचारी आहे, तुमची नोकर नाही.''
The crew also deserve respect. They are taught to maintain their cool and calm, serve people with a smile, even in the most challenging situations. But, that doesn’t mean people can be rude and insult them.
Back your crew, @IndiGo6E. Don’t abandon her. pic.twitter.com/Xt4jchc8rI
— Madhav Sharma (@HashTagCricket) December 21, 2022
हा धक्कादायक व्हिडिओ इस्तंबूलहून दिल्लीला (Delhi Viral Video) येणाऱ्या इंडिगो फ्लाइटमध्ये (Indigo Fight Video) घडला आहे. विमानातील प्रवाशांचे वर्तन योग्य नसल्यामुळे ती एअर होस्टेस टीम लीडर असल्याने तिला या प्रकरणात बोलावं लागलं. त्या प्रवाश्याने एअर होस्टेसचा अपमान केला आहे. शिवाय या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचंही इंडिगो कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.