पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा| सुंदर 'वधू' पाहून म्हातारा 'वर' आनंदी, Video पाहून नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचाच

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Updated: Aug 22, 2022, 07:18 PM IST
पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा|  सुंदर 'वधू' पाहून म्हातारा 'वर' आनंदी, Video पाहून नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया वाचाच title=

मुंबई : सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक वृद्ध व्यक्ती तरुण मुलीशी लग्न केल्यानंतर आपला आनंद रोखू शकत नाही. अंदाजे वराचे वय 80 ते 90 वर्षे असेल.

आणखी वाचा : विवाहीत महिलांसाठी आनंदाची बातमी!

या व्हिडीओत त्या वरानं गळ्यात माळ घातली आहे आणि तो एका सुंदर वधूसोबत बसून हसत आहे. वधू वयानं खूपच लहाण आहे आणि ती चेहरा खाली पाडून शांत बसली आहे. लग्नानंतर म्हाताऱ्या वराला खूप आनंद झाला आहे आणि नवविवाहित वधूच्या शेजारी आनंदानं बसू तो टाळ्या वाजवत आहे. वधू लाजाळू दिसत आहे आणि वराप्रमाणे लग्नाबद्दल उत्साही नाही. वधूनं सुंदर मेकअप लुकसह लाल आणि हिरव्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

आणखी वाचा : बापरे! ५ हजार कोटींची प्रॉपर्टी तरी सैफच्या मुलांना मिळणार नाही एक रुपया, जाणून घ्या कारण

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

वरानं पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला असून त्याच्या गळ्यात हार आहे. psycho_biihari या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्याला 116k पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 14k लाइक्स मिळाले आहेत. व्हायरल व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी वधूबद्दल त्यांना वाईट वाटत असल्याचे बोलत आहेत. तिला नको असतानाही जबरदस्ती तिनं लग्न केल्याचं तिच्या चेहऱ्यावर दिसत असल्याचेही अनेक नेटकरी बोलत आहेत. ही वृद्धव्यक्ती नशिबवान आहे असे अनेक वधू न मिळणाऱ्या तरूणांनी कमेंट करत त्यांचे दु:ख व्यक्त केले आहे.