बायको की गँगस्टर, नववधूचा पतीने आणि सासऱ्याने या कारणामुळे घेतला धसका

बायको की गँगस्टर, नववधूने घेतला पतीच्या छातीला चावा, सासऱ्याला म्हणाली...

Updated: Aug 22, 2022, 06:42 PM IST
बायको की गँगस्टर, नववधूचा पतीने आणि सासऱ्याने या कारणामुळे घेतला धसका title=

Crime News : नवरा-बायकोची भांडणं काही नवीन नसतात, अनेकवेळा अशा प्रकरणांमध्ये बायकोला तिचा नवरा मारहाण करत असल्याचं आपण ऐकलं असेल. मात्र उलट प्रकरण समोर आलं आहे. एका पतीने त्याला बायको मारहाण करत असून दारू पिऊन घरातील लोकांना मारण्याची धमकी देत असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.  

नेमकं काय आहे प्रकरण? 
नवीन लग्न झालेलं असताना नववधू ही तिच्या नवऱ्याला दाताने चावा घेते. त्यासोबतच ती दारू आणि भांगेची नशा करत असल्याची तक्रार पतीने दाखल केली आहे. एक दिवस रात्री 12 वाजता पती गाढ झोपेत असताना पत्नी त्याच्या नवऱ्याला उठवते, त्यानंतर त्याच्याशी भांडायला सुरूवात करते. इतकंच नाही तर तिच्या बांगड्या फोडते आणि भिंतीवर डोकं आपटते.

भांडणामध्ये पत्नीने पतीच्या हाताला आणि छातीला चावत जखम केली. त्यासोबतच तिने पतीच्या वडिलांनाही म्हणजेच सासऱ्यालाही जिवंत मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पतीने 112 नंबरवर फोन करत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस पोहोचल्यावर पतीने आपल्याला बायकोपासून सुटका हवी असल्याचं पोलिसांना सांगितलं. उत्तर प्रदेशातील अलीगढ जिल्ह्यातील खंडेया गावचं हे प्रकरण आहे.