चोरी करायला आला आणि...पुढे काय झालं बघा हा व्हिडीओ

सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून नक्की तुम्हाला हसू आवरणार नाही.

Updated: Aug 16, 2022, 06:33 PM IST
चोरी करायला आला आणि...पुढे काय झालं बघा हा व्हिडीओ title=
trending news thieves stole from thieves funny video goes viral on social media in marathi

Viral Video  - दिवसाढवळा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. मार्केट परिसर असो किंवा मॉल याठिकाणी पाकिटे चोरणाऱ्यांची संख्या वाढत आहेत. आपण सोशल मीडियावर चोरी करणाऱ्याचे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. चोरी करण्यासाठी चोऱ्यांची भन्नाट कल्पना पाहून तर आपल्याला हसू आवरणार नाही. 

सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर चोरीचा व्हिडीओ व्हायरल होतो असतात. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतो आहे तो पाहून नक्की तुम्हाला हसू आवरणार नाही. या व्हिडीओमधील चोराने चोरी करण्यासाठी जी शक्कल लढवली आहे त्याची आपण स्वप्नात पण कल्पना करु शकणार नाही. (trending news thieves stole from thieves funny video goes viral on social media in marathi)

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन व्यक्ती रस्त्याच्या कडेला असलेल्या गाडीजवळ मोबाईलमध्ये काही तरी बघत उभे आहेत. त्याच वेळी रस्त्यावरून बाइकवर दोन व्यक्ती जातात. थोड्या दूर जाऊ बाइकवरील व्यक्ती परत मागे फिरतात आणि त्या दोन व्यक्तींजवळ येऊन उभे होतात. त्यांचा धानीमनी पण नसेल की आपल्यासोबत काय होणार आहे ते. या बाइकवरील चोरांनी त्याना चाकूचा धाक दाखवून मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीजवळ उभ्या असणाऱ्या व्यक्तींनी थेट बंदुका काढल्या आणि दुचाकी घेऊन पसार झालेत. 

हा चोरीचा मजेदार व्हिडीओ ट्विटरवर Vicious Videos या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 38 सेकंदांचा हा व्हिडीओला आतापर्यत 35 हजारांहून अधिक व्यूज मिळाला आहे. या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहे. काही जणांनी हा फेक व्हिडीओ असल्याचं म्हटलं आहे.