Dudhsagar Waterfall Viral Video: पावसाळा आला की सर्वांच्या अंगात ट्रेकिंगचं (Treking) वारं सुटलं. बॅक उचलली अन् निघाला ट्रेकिंगला, असं एकंदरीत गणित झालंय. पावसाळा सुरु होताच पर्यटकांना धबधब्यांना जाण्यासाठी गर्दी होत असते. सोशल मीडियावर तर पावसळ्यातील निसर्गरम्य व्हिडीओ पाहून अनेकांचे डोळे भरून येतात आणि आपणही गेलं पाहिजे, असं वाटतं. मात्र, ट्रेकिंगच्या ठिकाणी पोहोचल्यावर जे काही दृष्य पहायला मिळतंय. ते पाहून अनेकांनी डोक्याला हात लावला आहे. सध्या प्रसिद्ध अशा दुधसागर धबधब्याचा (Dudhsagar Waterfalls Video) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विकेंड आला की सर्वजण बाहेर जाण्याचा प्लॅन करतात. त्यातील फेमस असं दूधसागर धबधबा. हो तोच.. शाहरूख खानच्या चेन्नई एक्सप्रेस सिनेमामध्ये दाखवलेला. दूधसागर धबधबा पाहायला निघालेल्या शेकडो पर्यटकांना रविवारी पश्चातापाचा सामना करावा लागला. एवढी गर्दी की पाय ठेवायला जागा नाही. रिल्स अन् फोटो काढायचे बाजुलाच राहुद्या. प्रसिद्धीच्या झोतात आलेला दूधसागर धबधबा पाहण्यात अनेकांनी गर्दी केली होती. मात्र, सगळा प्लॅन फेल गेल्याचं दिसून आलंय. त्याचबरोबर प्रवास करताना देखील सर्वांची दैना उडाल्याचं दिसून आलंय. सुट्टीचे हक्काचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोवालाही पावसाचा तडाखा बसला आहे.
आणखी वाचा - ट्रेकिंग करताय की मस्करी? लोहगडावर पर्यटकांचा चार तास खोळंबा; पाहा Video
शनिवारी आणि रविवारी हा धबधबा पाहण्यासाठी कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यातून हजारो पर्यटक येतात. पाऊस चांगला झाल्यामुळे धबधबा पूर्ण प्रवाहित झालाय. त्यामुळे कोणतीही जीवितहाणी होऊ नये, म्हणून धबधबा पाहण्यासाठी रेल्वे पोलिसांनी बंदी घातली आहे. काही प्रवाशांनी दुसऱ्या मार्गाने जाण्याचा प्रवास केला, त्यांना रेल्वे पोलिसांनी रोखून उठाबशा काढायला लावल्या.
End this Herd Mentality
Dudhsagar Falls trek today pic.twitter.com/Ldk93RN5dQ
— Visit Udupi (@VisitUdupi) July 16, 2023
दरम्यान, दक्षिण गोवामध्ये मुसळधार पावसामुळे मांडवी नदी ओसंडून वाहू लागली आहे. मागील वर्षी पूलही पाण्यात वाहून गेला. यामुळे दूधसागर धबधब्याजवळ जवळपास 40 पर्यटक अडकले होते. राज्य सरकारने तैनात केलेल्या जवानांनी या पर्यटकांची सुटका केली होती. त्यामुळे यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून धबधबा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे आणि वन खात्याकडून घेण्यात आला आहे.