Congress President Election : अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये घमासान, रंपाट English बोलण्याऱ्या थरूरांसोबत 'हे' नेतेही रेसमध्ये

Congress President Election :  काँग्रेसचा अजेंडा ठरवतं असतानाच दुसऱ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात काँग्रेस व्यस्त आहे.  काँग्रेस पक्षाची घोडदौड कोण सांभाळणार अजून या प्रश्नचं उत्तर मिळालं नाही आहे. 

Updated: Sep 20, 2022, 11:55 AM IST
Congress President Election : अध्यक्षपदावरुन काँग्रेसमध्ये घमासान, रंपाट English बोलण्याऱ्या थरूरांसोबत 'हे' नेतेही रेसमध्ये title=
Treading news congress president election shashi tharoor ashok gehlot rahul gandhi Digvijay Singh nm

Congress President Election :  लोकसभा निवडणूक 2024 (LokSabha Election 2024) साठी सगळे पक्ष आतापासूनच कामाला लागले आहेत. देशातील सर्वात मोठे दोन पक्ष भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress)  2024 च्या निवडणुकीसाठी जोरदार तयारीला लागले आहेत. अशात भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांचं नाव आणि कामं घेऊन जनतेसमोर जाणार आहेत. तर काँग्रेसचा अजेंडा ठरवतं असतानाच दुसऱ्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यात काँग्रेस व्यस्त आहे.  काँग्रेस पक्षाची घोडदौड कोण सांभाळणार अजून या प्रश्नचं उत्तर मिळालं नाही आहे. 

सध्या राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत (Rajasthan Chief Minister Ashok Gehlot) आणि काँग्रेसचे खासदास डॉक्टर शशि थरूर (Congress MP Doctor Shashi Tharoor) काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रेसमध्ये शामिल झाले आहेत. तेच मात्र राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) नावाबद्दल अद्याप सस्पेंस काय आहे. शशि थरूर यांनी सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची भेट घेतल्यावर त्यांचा नावाची चर्चा जोर घेत होती. त्यात काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची इच्छा असल्याचं शशि थरूर यांनी अनेक वेळा संकेत दिले होते. 

त्याचवेळी अशोक गेहलोत यांच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की, गेहलोत यांनी निवडणूक लढवणार की नाही हे अद्याप ठरवलेले नाही. स्वत: अध्यक्ष होण्याचा विचार न करता केवळ राहुल गांधींनीच पदभार स्वीकारावा, असा त्यांचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे ही सुद्धा चर्चा आहे की, सूत्रांनुसार अशोक गहलोत लवकरच दिल्ली दौरा करणार असून यावेळी ते अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करु शकतात. (Treading news congress president election shashi tharoor ashok gehlot rahul gandhi Digvijay Singh nm)

पण काँग्रेसमधील एक गटचं असं म्हणं आहे की, "जर गांधी घराण्यातील कोणीही या पदासाठी अर्ज भरला नाही आणि थरूर यांनी उमेदवारी दाखल केली, तर आम्ही निश्चितपणे त्यांच्या विरोधात उमेदवार देऊ," आणि मग ते अशोक गेहलोत असोत वा दिग्विजय सिंग (Digvijay Singh). असा पवित्रा काँग्रेसमधील या गटाने घेतला आहे. 

तरदुसरीकडे आता राहुल गांधींनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, अशी मागणीही या गटातून जोर धरू लागली आहे. दिल्लीत (Delhi) अनेक राज्य काँग्रेस समित्यांनी राहुल गांधींच्या समर्थनार्थ ठराव (Resolution in support of Rahul Gandhi) पारित केला. राजस्थान (Rajasthan), गुजरात (Gujarat) आणि छत्तीसगड (Chhattisgarh), तामिळनाडू (TamilNadu), महाराष्ट्र (Maharashtra), जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) आणि बिहारमधील (Bihar) काँग्रेस युनिट्सने ठराव मंजूर केला, की राहुल गांधींनी पुन्हा एकदा पक्षाची सूत्रे हाती घ्यावीत. 

 काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना 22 सप्टेंबरला (22 September 2022 ) जारी होणार असून, 24 ते 30 (24 To 30 September 2022)सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 8 ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला (17 October 2022) मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला (19 October 2022) निकाल जाहीर केला जाईल.