'टोल वसुलीला स्थगिती दिल्याने होऊ शकतो हा धोका', टोल अभ्यासकाचे पंतप्रधानांना पत्र

टोल नाक्यांवरील स्थिगितीविरोधात पंतप्रधानांना पत्र

Updated: Mar 28, 2020, 07:16 AM IST
'टोल वसुलीला स्थगिती दिल्याने होऊ शकतो हा धोका', टोल अभ्यासकाचे पंतप्रधानांना पत्र title=

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर केंद्र आणि राज्य सरकारन अनेक उपाययोजना आखत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टोल नाक्यांवरील वसुलीला तुर्तास स्थगिती दिली आहे. पण हा निर्णय सरकारला भविष्यात नुकसान देणारा ठरु शकतो अशी भीती टोल अभ्यासकांनी वर्तवली आहे. या निर्णयामुळे केवळ टोल कंत्राटदारांचे फावणार असून वेगळं काही निष्पन्न होणार नसल्याचे मत टोल अभ्यासक व्यक्त करत आहे.

नितीन गडकरी यांच्या निर्णयाला आवाहन देणार पत्र पंतप्रधानांना पाठवण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे सर्व महामार्गावरील वाहतूक कमी झाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अतिमहत्वाच्या वाहनांना तिथे थांबण्याची गरज लागत नाही. याऊलट टोल कंत्राटदार शेकडो कोटी रुपयांची टोल वसूली सरकारडून करतील असे या पत्रात म्हटले आहे.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आता टोल वसुली थांबवू नये कारण आता संबंध भारत लॉक डाउन आहे रस्ते मोकळे आहेत त्यामुळे तशीही काही अडचण येणार नाही येते काही दिवस टोल बंद राहिल्यास टोल कंत्राटदार तोटा दाखवून शासनाकडे भरपाई मागतील हे होऊ नये म्हणून टोल सुरू राहावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते आणि टोल अभ्यासक प्रवीण वाटेगावकर यांनी केली आहे या संदर्भात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार नोंदवत पत्र व्यवहार केला आहे.

केंद्रीय परिवहन विभागाच्या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूलीस स्थगित करण्यात आली आहे. 

देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय. देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. पण याचे भविष्यातील परिणाम तितकेसे चांगले नसतील अशी भीती टोल अभ्यासक व्यक्त करत आहेत.

कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.

पण टोल अभ्यासकांनी यावर आपले पत्र पाठवल्यानंतर केंद्राच्या निर्णयात काही बदल होतो का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.