मुंबई : गेल्या काहीदिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होताना दिसत आहे. लग्न सराई असल्यामुळे सर्वांची पाऊले सोने, चांदी खरेदी करण्याकडे वळत आहेत. अशात सोन्याच्या दरात होणारी वाढ सर्वसामान्यांच्या खिश्याला परवडणारी नाही. परंतु आता सोने आणि चांदीच्या दरात काही अंशी घसरण झाली आहे. आज सोन्याची किंमत ४४ हजार ५५० रुपये तोळा आहे तर चांदी ४७ हजार ५१७ रुपये प्रतिकिलो आहे.
सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. राष्ट्रीय राजधीनी दिल्लीमध्ये सोन्याच्या दरात १५७ रूपयांची घसरण झाली आहे. या घसरणीमुळे सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४४,२५० रुपयांवर आली आहे. एचडीएफसी सेक्यूरीटीच्या वृत्तानुसार सोन्याच्या मागणीतील स्थिरतेमुळे किंमतीतील ही घट नोंदविण्यात आली आहे.
वायदा बाजारात सोनं रेकॉर्ड स्तरावर
डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरूच
एका डॉलरचा भाव 73 रुपये 94 पैसे
सोनं 44 हजार 550 रुपये तोळा https://t.co/HOK58ckddW#GoldPrice #Gold pic.twitter.com/leT76LzWaQ— ZEE २४ तास (@zee24taasnews) March 6, 2020
गेल्या अठवड्यात सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४४ हजार ४०७ रूपये होती. सोन्या सोबतच चांदीच्या किंमतीत देखील घसरण झाली आहे. गेल्या अठवड्यात चांदीची किंमत प्रतिकिलो मागे ४७ हजार ६१६ रूपये इतकी होती. आता चांदीच्या किंमतीत देखील १०० रूपयांची घसरण झाली आहे.
कोरोनामुळे जगाभरातले शेअर बाजार कोसळले आहेत. त्याचा मोठा परिणाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळालाय. पहिल्या सत्रात सेन्सेक्स १३५० अंकांनी कोसळला तर निफ्टी ४५० अंकांनी कोसळला. बाजारात ३ टक्क्यांनी घसरण झाली. रूपयाचीही कमालीची घसरण झाली.
रूपया ऑक्टोबर २०१८ नंतर प्रथमच निचांकी स्तरावर पोहोचला आहे. रूपयाच्या तुलनेत आज डॉलरचा भाव ७३ रूपये ९४ पैसे होता. तर सोने वायदे बाजारात रेकॉर्ड ब्रेक पातळीवर पोहोचले आहे.