कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या औषधाची खेप भारतात, सर्वाधिक डोस महाराष्ट्राला मिळणार

कोराना रुग्णांसाठी आवश्यक असलेली टोसिलुजुमॅबची (Tocilizumab) नवीन खेप आता भारत आली आहे.

Updated: Apr 28, 2021, 07:28 PM IST
कोरोनासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या औषधाची खेप भारतात, सर्वाधिक डोस महाराष्ट्राला मिळणार title=

मुंबई : कोराना रुग्णांसाठी आवश्यक असलेली टोसिलुजुमॅबची (Tocilizumab) नवीन खेप आता भारत आली आहे. या औषधाची सुमारे 3 आठवड्यांपासून भारतात कमतरता होती. सिप्लाने टोसिलुजुमॅबचे (Tocilizumab) 3 हजार 245 नवीन डोस आयात केले आहेत. सिप्ला ही एकमेव कंपनी आहे. जी या औषधाची आयात करते. केंद्र सरकारनेही टोसिलुजुमॅबच्या (Tocilizumab) वितरणाविषयी माहिती शेअर केली आहे.

टोसिलुजुमॅबचे जास्तीत जास्त डोस महाराष्ट्राला दिले जाईल. देशातील कोरोनाच्या अनियंत्रित दुसर्‍या लाटेच्या दरम्यान, कोविड 19 रूग्णांच्या उपचारासाठी प्रभावी असलेल्या टोसिलुजुमॅब आणि रेमडेसिवीर सारख्या काही औषधांची प्रचंड कमतरता आहे.

सरकारच्या म्हणण्यानुसार टोसिलुजुमॅबच्या (Tocilizumab) नवीन खेपेचा राज्यवार वाटप केला जाईल. हे औषध थेट राज्यांना दिले जाईल. महाराष्ट्राला यातील जास्तीत जास्त म्हणजे 800 डोस मिळतील. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार ते राज्यांच्या गरजेनुसार डोसचे वितरण करतील. सिपलाला भारतात टोसिलुजुमॅबचे मार्केटिंग आणि  डिस्ट्रीब्यूशनचे अधिकार दिले गेले आहेत.

टोसिलुजुमॅबच्या नवीन खेपेच्या डिस्ट्रीब्यूशनमध्ये राजधानी दिल्लीला 500, गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू आणि पंजाबला प्रत्येकी 200  डोस पुरविले जातील. याशिवाय, केंद्राअंतर्गत असलेल्या संस्थांना टोसिलुजुमॅबचे 200 डोस मिळतील. केंद्र सरकारने सांगितले की, हे वितरण तातपुरते आहे, नवीन साठा येताच राज्यांचा कोटा वाढवला जाईल.

टोसिलुजुमॅबची निर्मिती Roche या जर्मन औषधी कंपनीने केली आहे. त्याची एमआरपी भारतात 40 हजार रुपये प्रति 400 mg इंजेक्शन आहे. कोरोना रूग्णांसाठी उपचारा दरम्यान डॉक्टर हे औषध वापरतात.

कोरोनामुळे 24 तासात 3 हजार 293 लोकांचा मृत्यू

आरोग्य मंत्रालयाने सकाळी 8 वाजता जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत कोरोना संक्रमणाचे एकूण 3 लाख 60 हजार 960 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, कोरोनामुळे 3 हजार 293 लोकांचा मृत्यू झाला आहे.

आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत एकूण प्रकरणांची संख्या वाढून 1,79,97,267 वर गेली आहे, तर 1,48,17,371 लोकं बरे झाले आहेत. एकूण मृत्यूंबद्दल जर आपण बोललो तर ते आता वाढून 2,01,187 झाले आहे. देशात सध्या एकूण 29,78,709 सक्रिय रुग्ण आहेत.