विधानसभा निवडणुकीआधी ममता बॅनर्जींना मोठा धक्का

 पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत.

Updated: Dec 16, 2020, 05:38 PM IST
विधानसभा निवडणुकीआधी ममता बॅनर्जींना मोठा धक्का title=

कोलकाता : पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2021 मध्ये होणाऱ्या या निवडणुकीआधी भाजपने येथे जोरदार तयारी सुरु केली आहे. बंगालमधील राजकारणात यंदा मोठा संघर्ष होण्याची चिन्ह आहेत. त्यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांना मोठा झटका लागला आहे. TMC चे नेते शुभेंदु अधिकारी (Subhendu Adhikari) यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.

शुभेंदु अधिकारी मागील काही दिवसांपासून ममता सरकारवर नाराज होते. त्यांनी परिवहन मंत्री पदाचा ही राजीनामा दिला होता. शुभेंदु अधिकारी आता काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलं आहे. पण ते भाजपमध्ये जातील अशी चर्चा सुरु आहे. गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या बंगाल दौऱ्यात ते भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अमित शाह हे 19 डिसेंबरला बंगाल दौऱ्यावर येणार आहेत.

शुभेंदु यांनी पक्ष आणि ममता बॅनर्जी यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटलं की, त्यांच्यावर 11 वेळा हल्ले झाले. त्यानंतर केंद्र सरकारने त्यांनी झेड श्रेणीची सुरक्षा दिली आहे.

मेदिनीपुर येथील एका रॅलीत ते म्हणाले की, 'माझ्या सोबत जनता उभी आहे. तेच माझे कुटुंब आहेत. माझं कुटुंब संपूर्ण बंगाल आहे. अशा हल्ल्यांनी मी घाबरणार नाही.'