दिलदार चोरटे: कार घेऊन गेले पण, इन्शुरन्स पेपर देऊन गेले

दिलदार चोरटे वाट्याला येणे ही एक कमालच. तसेच, ही कामाल वास्तवात घडणे हाही एक चमत्कारच. पण, हा चमत्कार खरोखरच घडला आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये एका व्यक्तीला असे चोरटे भेटले आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 19, 2017, 05:06 PM IST
दिलदार चोरटे: कार घेऊन गेले पण, इन्शुरन्स पेपर देऊन गेले title=
छायाचित्र सौजन्य: डीएनए डॉट कॉम

अमृतसर : दिलदार चोरटे वाट्याला येणे ही एक कमालच. तसेच, ही कामाल वास्तवात घडणे हाही एक चमत्कारच. पण, हा चमत्कार खरोखरच घडला आहे. पंजाबमधील अमृतसरमध्ये एका व्यक्तीला असे चोरटे भेटले आहेत.

बंदूकीचा धाक दाखवून चोरली कार

चोरी ही वाईटच. मग ती कोणतीही असो. पण, चोरीच्या धंद्यातसुद्धा प्रामाणीकणा दाखवणे किंवा आपल्या चोरीचा दुसऱ्याला फटका बसू नये असा विचार करणारे चोरटे मिळणे तसे कठीणच. पण, अमृतसरमधील नेकदिली येथील प्रकरण काहीसे निराळेच. येथील एका व्यक्तीला बंदूकीचा धाक दाखवून चोरऱ्यांनी त्याची कार हातोहात लांबवली. पण, विशेष असे की, या चोरट्याने कार चोरताना निर्दयीपणा दाखवला. पण, जाताजाता या व्यक्तिला गाडीचे इन्शोरन्स पेपर देऊन दिलदारपणाही दाखवला.

क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्दूच्या घराजवळ घडली घटना

ही घटना पंजाब सरकारमधील विद्यमान मंत्री आणि माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंह सिद्दी यांच्या घराजवळ घडली. पीडित पटविंदर सिंह हे अमृतसरमध्ये एक रेस्टॉरंट चालवतात. ते आपल्या पत्नीला हॉलगेटजवळ सोडण्यासाठी गेले होते. तिथून त्या चंडीगढसाठी बस घेणार होत्या. पत्नीला सोडून परत येणाऱ्या पटविंदर यांची कार काही चोरट्यांनी रस्त्यातच आडवली.

इन्शुरन्स पेपर दिले परत

पीडित पटविंदर सिंह यांनी दिलेली माहिती अशी की, एक चोरटा ड्रायव्हर पाठीमागच्या सीटवर बसला. तर, दुसऱ्याने पटविंदर सिंह यांच्या डोक्याला बंदूक लावली. चोरट्यांचा एक सहकारी दुसऱ्या गाडीतून त्यांच्या मागे मागे येत होता. या विचित्र चोरट्यांनी पटविंदर सिंह यांना गाडीतले सर्व पेपर्स एकत्र करण्यास सांगितले. ते पेपर त्यांनी काळजीपूर्वक पाहिले आणि त्यातील इन्शुरन्स पेपर परत दिले.

तपास सुरू आहे

दरम्यान, स्थानिक एडीसीपी लखबीर सिंह यांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, सिसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यात काही चोरटे हॉल गेटपासूनच त्यांचा पाटलाग करत असल्याचे दिसते. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, तपास सुरू केला आहे.