नवी दिल्ली : सामान्यांच्या घरी चोरीच्या अनेक घटना समोर येत असतात पण आता चक्क भाजप आमदाराच्याच घरी चोरी झाल्य़ाचा प्रकार समोर आला आहे. बिहारमध्ये चोरीच्या घटना तशा सामान्य आहेत. पण जर आमदाराच्याच घरी चोरी होत असेल तर सामान्यांचं काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित केला जात आहे. लोहाणीपूर येथील कुम्हरारमधून आमदार अरुण सिन्हा यांच्या घरी चोरी झाली आहे.
रामविलास अपार्टमेंटमध्ये अरुण सिन्हा यांचा फ्लॅट आहे. चोरांनी दरवाजा तोडून उशीरा रात्री घरात चोरी केली. चोर लॉकर खोलण्याच अयशस्वी ठरले त्यामुळे मोठी चोरी होण्यापासून वाचली. पण घरातून अनेक महागड्या साड्या, वस्तूंवर चोरांनी डल्ला मारला आहे. पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. इतक्या अलिशान भागात ही चोरी झाली. तर पोलीस गस्त घातलतात की नाही असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बिहारमध्ये मागील काही दिवसांपासून चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. सत्तेत असणाऱ्या पक्षाच्या आमदाराच्याच घरात चोरी झाल्य़ाने पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त होत आहे. सरकार देखील यापासून काही धडा घेईल का असं देखील सामान्यांचं म्हणणं आहे.