जगातला सर्वात महागडा चहा भारतात

 अरुणाचल प्रदेशात  तयार होणाऱ्या गोल्डन नीडल ब्रँडचा चहा सर्वात महागडा चहा बनलाय. 

Updated: Aug 24, 2018, 11:49 AM IST
जगातला सर्वात महागडा चहा भारतात  title=

मुंबई : जगातला सर्वात महागडा चहा कुठे तयार असा प्रश्न जर तुम्ही सामान्य ज्ञानाच्या परीक्षेत विचारला...तर त्याचं उत्तर बिनधास्तपणे भारतात असं देऊन मोकळे व्हा...कारण अरुणाचल प्रदेशात  तयार होणाऱ्या गोल्डन नीडल ब्रँडचा चहा सर्वात महागडा चहा बनलाय. 

किलोला ४० हजार 

आसामची राजधानी गुवाहाटीमध्ये सध्या जगभरातल्याचा चहांच्या दर्जानुसार लिलाव सुरूवात झालीय. या दरम्यान गोल्डन नीडल चहाच्या एका किलोला तब्बल ४० हजार रुपयांचा भाव मिळालाय.