'मोदी सत्तेवर आल्यामुळेच काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाली'

काश्मीरमध्ये होणाऱ्या अत्याचारांसाठी केवळ लष्करच नाही तर स्थानिक पोलीसही जबाबदार आहेत.

Updated: Apr 3, 2019, 07:14 PM IST
'मोदी सत्तेवर आल्यामुळेच काश्मीरमध्ये अशांतता निर्माण झाली' title=

श्रीनगर: नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यानंतर काश्मीरमध्ये पूर्वीसारखी अशांतता निर्माण झाली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी केला. ते बुधवारी कुपवाडा येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी काश्मीरमधील सद्य परिस्थितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबाबदार धरले. गुलाम नबी आझाद यांनी म्हटले की, २०१४ पर्यंत काश्मीरमधील परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली होती. मग २०१४ नंतरच असे काय झाले की, काश्मीरमध्ये पुन्हा १९९०-९१ सारखी परिस्थिती निर्माण झाली. या सगळ्याला एकमेव व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे या देशाचे पंतप्रधान, असे गुलाम नबी आझाद यांनी म्हटले. यावेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील स्थानिक पोलिसांनाही लक्ष्य केले. 

काश्मीरमध्ये होणाऱ्या अत्याचारांसाठी केवळ लष्करच नाही तर स्थानिक पोलीसही जबाबदार आहेत. त्यांनी स्थानिक लोकांवर कमी जुलूम केलेले नाहीत. ज्यांनी आपले कर्तव्या बजावताना प्राणांची आहुती दिली, अशा पोलीस अधिकाऱ्यांना मी सलाम करतो. मात्र, पोलीस दलात असेही लोक आहेत की, ज्यांनी पैसे आणि पदकांसाठी निशस्त्र लोकांची हत्या केली, असा आरोप गुलाम नबी आझाद यांनी केला.