भारतीय IT कंपन्यांचा जगात दबदबा; TCS ने रचला मोठा इतिहास

TCS 2nd most valuable IT services brand globally : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही जगातील IT सेवा क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. 

Updated: Jan 27, 2022, 12:33 PM IST
भारतीय IT कंपन्यांचा जगात दबदबा; TCS ने रचला मोठा इतिहास title=

मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ही जगातील IT सेवा क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. ब्रँड फायनान्स 2022 ग्लोबल 500 अहवालानुसार, IT कंपनी Infosysने देखील IT Services 25 रँकिंगमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाली आहे. इन्फोसिस हा झपाट्याने प्रगती करणारा ब्रँड बनला आहे. या यादीत देशातील इतर चार IT कंपन्यांचाही समावेश आहे. (TCS 2nd most valuable IT services brand globally, 5 others in top 25 tally)

आयटी सेवांशी संबंधित या क्रमवारीत एक्सेंचर पहिल्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार, Acenger ची ब्रँड व्हॅल्यू $36.2 बिलियन आहे. अहवालात म्हटले आहे की अमेरिकन आयटी कंपनी आयबीएम रँकिंगमध्ये चौथ्या स्थानावर गेली आहे. भारतातील IT कंपन्यांनी 2020 आणि 2022 दरम्यान सर्वात वेगवान वाढ नोंदवली आहे. जी सुमारे 51% आहे.

TCS चे ब्रँड मूल्य $16.786 अब्ज
अहवालानुसार, TCS चे ब्रँड मूल्य गेल्या 12 महिन्यांत $1.844 अब्ज (12.5%) ने वाढून $16.786 अब्ज (सुमारे 1.26 लाख कोटी) झाले आहे. कंपनीने सांगितले की IT सेवा फर्म TCS ने 2021 मध्ये $25 अब्ज कमाई केली.

ब्रँड फायनान्सचे सीईओ आणि अध्यक्ष डेव्हिड हेग म्हणाले की, प्रथमच, टीसीएस हा IT क्षेत्रातील दुसरा सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. ही कंपनी आयटी सेवांच्या क्रमवारीत सातत्याने सुधारणा करत आहे. TCS ने गेल्या वर्षी आपली जागतिक ब्रँड व्हॅल्यू मजबूत केली. सततच्या गुंतवणुकीमुळे कंपनीने हे स्थान गाठले आहे.

आयटी कंपन्यांना रिमोट वर्किंगचा फायदा
ब्रँड फायनान्सने आपल्या अहवालात म्हटले आहे की आता व्यवसायात रिमोट काम करणे किंवा घरातून काम करणे सामान्य झाले आहे. हा नवा ट्रेंड जगभर पाहायला मिळत आहे. 

जागतिक अर्थव्यवस्थेत डिजिटायझेशनची भूमिका सर्वात महत्त्वाची बनली आहे. यामुळेच गेल्या दोन वर्षांत आयटी सेवांनी सर्वाधिक वेग घेतला आहे. भविष्यात, भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) मध्ये मोठी भूमिका बजावणार आहे.