विमान उद्योगात TATA पुन्हा गाजवणार वर्चस्व, रतन टाटा म्हणाले - वेलकम बॅक एअर इंडिया

एअर इंडिया 68 वर्षांनंतर टाटा सन्सकडे Tata Son's परत गेली आहे. सर्वाधिक बोली टाटा सन्सने लावली.

Updated: Oct 8, 2021, 08:48 PM IST
विमान उद्योगात TATA पुन्हा गाजवणार वर्चस्व, रतन टाटा म्हणाले - वेलकम बॅक एअर इंडिया title=

मुंबई : टाटा समूहाने तोट्यात जाणारी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची बोली जिंकली आहे. TATA ग्रुपने 18000 कोटी रुपयांची बोली लावली होती. आता टाटा समूह Air India चा नवीन मालक असणार आहे. एअर इंडिया टाटा समुहाकडे गेल्याने अनेक नागरिकांनाही आनंद व्यक्त केला आहे.

एअर इंडिया 68 वर्षांनंतर टाटा सन्सकडे Tata Son's परत गेली आहे. सर्वाधिक बोली टाटा सन्सने लावली. टाटा सन्सने एअर इंडियाला 18 हजार कोटींमध्ये खरेदी केले आहे. दीपमचे सचिव तुहिन कांता पांडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली.

टाटा सन्स एअर इंडिया आणि त्याचा दुसरा उपक्रम एअर इंडिया एक्स्प्रेसमध्ये १०० टक्के भागभांडवल धारण करेल, तर ग्राउंड-हँडलिंग कंपनी एअर इंडिया सॅटस एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचीही ५० टक्के हिस्सेदारी असेल. या महिन्याच्या सुरुवातीला, टाटा सन्स आणि स्पाइसजेटचे अध्यक्ष अजय सिंह या दोघांनी बोली लावली होती.