'तिनं माझे ब्रेस्ट…', छेड फक्त पुरुषच काढत नाहीत!’ संजीदा शेखचा धक्कादायक खुलासा

संजीदा शेखनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला नाईट क्लबमध्ये आलेल्या या धक्कादायक अनुभवाविषयी सांगितलं आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 3, 2024, 12:59 PM IST
'तिनं माझे ब्रेस्ट…', छेड फक्त पुरुषच काढत नाहीत!’ संजीदा शेखचा धक्कादायक खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Sanjeeda Shaikh : संजय लीला भन्साळी यांची 'हीरामंडी' ही आजही चर्चेत आहे. या सीरिजमधील सगळ्याच कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर या सीरिजमध्ये वहीदाची भूमिका साकारत सगळ्यांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री संजीदा शेख सतत चर्चेत असते. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत संजीदानं तिच्या आयुष्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला. आमिर अलीशी लग्न मग घटस्फोट आणि त्यासोबत लेकीविषयी देखील अनेक गोष्टी सांगितल्या. आता या घटनेनंतर तिनं नाईट क्लबमध्ये एका महिलेनं तिच्याशी गैरवर्तन केल्याची घटना घडली आणि त्यामुळे तिचा मानसिक आघात झाला. 

संजीदा शेखनं 'हाउटरफ्लाई' ला दिलेल्या मुलाखतीत या घटनेविषयी सांगितलं. त्यावेळी सांगितलं की कशा प्रकारे त्या एका घटनेनं तिला अनेक गोष्टींविषयी विचार करण्यास भाग पाडलं. 'मला एक घटना हल्की फुल्कि आठवते. ज्यात एक महिला होती. मी एका नाईट क्लबमध्ये गेले होते. तेव्हा एक मुलगी माझ्या जवळून जात होती आणि तिनं तिथून जाताना माझ्या ब्रेस्टला स्पर्श केला आणि पुढे निघून गेली. मी बराचवेळ शॉक्ड होती की माझ्यासोबत हे काय झालं', असं संजीदा शेख म्हणाली. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

संजीदा शेखनं पुढे सांगितलं की 'आपण ऐकतो की माणसं तुमच्या बॅकवर मारतात. तुमच्यासोबत गैरवर्तन करतात. पण महिला देखील कमी नसतात. जर तुम्ही चुकीच्या मार्गावर जात आहात तर तुम्हाला कोणाशी काही घेणं देणं नसतं आणि त्यावर पुढे तसेच जाता. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा महिलेशी घेणं देणं नसतं. जे चुकीचं आहे ते आहेच. जर कोणत्याही महिलेनं तुमच्यासोबत गैरवर्तन केलं तर त्याविषयी सांगा. कारण मला वाटतं की पीडित असल्याचं खोट नाटक करणं खूप घाणेरडी गोष्ट आहे.' 

हेही वाचा : सुशांतच्या फ्लॅटमध्ये राहायला आलेली अदा शर्मा का म्हणते 'मनात आलं...'?

संजीदा शेखनं आमिर अलीला 2020 मध्ये घटस्फोट दिला. तिनं सांगितलं की ती सगळ्यात जास्त स्ट्रेटमध्ये होती आणि ती स्वत: ला अभागी समजत होती. पण त्याच्या काही काळानंतर तिनं स्वत: वर प्रेम करण्यास सुरुवात केली. आता ती या सगळ्या गोष्टींमधून बाहेर पडली आहे आणि तिच्या नव्या रुपाला पाहून आनंदी आहे. गेल्या वर्षी अशी माहिती समोर आली होती की संजीदा ही अभिनेता हर्षवर्धन राणेला डेट करते. पण अभिनेत्रीनं ही अफवाह असल्याचं म्हटलं होतं. तिनं म्हटलं की तिच्यावर अशा कोणत्याही अफवाहनचा परिणाम होत नाही.