काय सांगता! ताज महालचं नाव होणार राम महाल?

जगातील ७ आश्चर्यांपैकी एक असलेलं, प्रेमाचं प्रतीक मानलं जाणाऱ्या ताज महालचं लवकरच नामांतर राम महल होईल, असा दावा भाजप आमदाराने केला आहे. उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

Updated: Mar 14, 2021, 05:06 PM IST
काय सांगता! ताज महालचं नाव होणार राम महाल?  title=

जगातील ७ आश्चर्यांपैकी एक असलेलं, प्रेमाचं प्रतीक मानलं जाणाऱ्या ताज महालचं लवकरच नामांतर राम महल होईल, असा दावा भाजप आमदाराने केला आहे. उत्तर प्रदेशचे भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी हे वक्तव्य केलं आहे.

आग्रा स्थित ताज महाल हे आधी भगवान शंकराचं मंदिर होतं, असा दावाही सुरेंद्र सिंह यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

पुढे जाऊन सुरेंद्र सिंह असंही म्हणाले आहेत, ‘शिवाजींच्या वंशजाच्या रूपात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आले आहेत. गोरखनाथ यांनी शिवाजींच्या रूपात योगी आदित्यनाथ यांना जन्म दिला.’ आपल्या वक्तव्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रत्येक वेळी एकेरी उल्लेख केला.

अशा प्रकारे वादग्रस्त वक्तव्य करण्याची भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांची ही पहिलीच वेळ नाही. तर याआधीही हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात त्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वाद रंगला होता. तेव्हा सुरेंद्र सिंह म्हणाले होते की, ‘मुलींवर चांगले संस्कार करण्यात आले, तर बलात्कार होणार नाहीत.’