Sukesh Chandrasekhar Letter: जॅकलिनला फसवणाऱ्या महाठग सुकेशचं धक्कादायक पत्र समोर; 'या' पक्षाच्या नावामुळं खळबळ

200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं अणखी अणखी एक पत्र समोर आलं आहे.   

Updated: Nov 8, 2022, 11:02 AM IST
Sukesh Chandrasekhar Letter: जॅकलिनला फसवणाऱ्या महाठग सुकेशचं धक्कादायक पत्र समोर; 'या' पक्षाच्या नावामुळं खळबळ title=

Sukesh Chandrasekhar accuses Arvind Kejriwal and AAP:  200 कोटी रुपयांच्या खंडणीप्रकरणी तुरुंगात असलेल्या महाठग सुकेश चंद्रशेखरचं (Sukesh Chandrasekhar) अणखी अणखी एक पत्र समोर (Sukesh Chandrasekhar Letter )आलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता समोर आलेल्या पत्रामध्ये सुकेशने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) आणि आम आदमी पार्टीवर (AAP)खळबळजनक आरोप केले आहेत. या पत्रामुळे केजरीवाल आणि पक्ष चर्चेत आले आहेत. 

कोणत्याही दबावाखाली खुलासा करत नाही - सुकेश चंद्रशेखर
'अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी आता प्रश्न उपस्थित करत आहेत, की हे सगळं मी आता का करत आहे. हे मी प्रकरण ईडी आणि सीबीआयसमोर का मांडले नाही? मला उत्तर द्यायचे आहे की मी हे खुलासे यापूर्वी केले नव्हते कारण मी सतत सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होतो. (sukesh chandrasekhar wiki)

पण, जेव्हा मला तुरुंग प्रशासनाकडून सतत धमक्या येऊ लागल्या आणि गोवा आणि पंजाबच्या निवडणुकांदरम्यान निधी उपलब्ध करून देण्यासाठी माझ्यावर दबाव येऊ लागला, तेव्हा मी पुन्हा तसं करण्याचा निर्णय घेतला. मी हे कोणाच्या सांगण्यावरून किंवा दबावाखाली करत नाही. (sukesh chandrasekhar business)

निवडणुकीसाठी निधी दिल्याचा आरोप
'केजरीवाल मला सांगा संदीप गोयल यांच्याविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात जी तक्रार केली होती, ती  केलेली तक्रार मागे घेण्यास जैन मला सतत का सांगत होते. निवडणुकीसाठी निधी द्या, अशी धमकी का दिली जात होती? तुम्ही प्रामाणिक असाल तर चौकशीला का घाबरता.'  असा प्रश्न देखील सुकेशने पत्राच्या माध्यमातून उपलब्ध केला आहे. 

मला कोणाच्या मदतीची गरज नाही -  सुकेश चंद्रशेखर
'माझ्या प्रकरणात मला मदत केली जात आहे, म्हणून मी हे सर्व करत आहे? असं मनीष म्हणाले आहेत. मला याचं उत्तर देताना आनंद होईल मला कोणाच्या मदतीची गरज नाही, मी स्वतःची काळजी घेवू शकतो. म्हणून मला विचलित करण्याचा प्रयत्न करू नका आणि उत्तर द्या. (sukesh chandrasekhar story)

मला धमकावनं बंद करा - सुकेश चंद्रशेखर
'केजरीवाल विजयाचे स्वप्न पाहणं बंद करा. मला धमकावणं आणि प्रलोभन देणं बंद करा. मला तुमच्या कोणत्याही ऑफरमध्ये रस नाही. हे प्रकरण न्यायालयासमोर आणण्याचा माझा प्रयत्न असेल. 2016 पासून आतापर्यंत मी सर्व नोंदी ठेवल्या आहे.' (sukesh chandrasekhar net worth)

पुढे सुकेश चंद्रशेखर म्हणाला, 'केजरीवाल तुम्ही आणि तुमच्या सहकाऱ्यांनी मला चिथावणी देणं थांबवा. कारण मी आणखी एक गोष्ट समोर आणेल आणि ती तुम्हाला माहित आहे. कृपया शिष्टाचार पाळा, चौकशीला उत्तर द्या आणि सत्याचं स्वीकार करा. (sukesh chandrasekhar biography)