याला म्हणतात कहर! बारावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केला सीमा हैदरचा उल्लेख; मास्तरांच्या डोक्यात मुंग्या

Seema Haider In Answersheet : सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका (Viral News) सध्या व्हायरल होत आहे. शाळेच्या 12 वीच्या परीक्षेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा आणि त्याची लांबी यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला होता.

सौरभ तळेकर | Updated: Dec 25, 2023, 10:44 PM IST
याला म्हणतात कहर! बारावीच्या उत्तरपत्रिकेत विद्यार्थ्याने केला सीमा हैदरचा उल्लेख; मास्तरांच्या डोक्यात मुंग्या title=
Seema Haider, Answersheet Viral Post

Seema Haider Viral Answersheet : नेपाळमार्गे पाकिस्तानातून भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. 13 मे रोजी अवैध पद्धतीने सीमा हैदरने भारतात घुसखोरी केली. त्यानंतर ती ग्रेटर नोएडा इथे ती सचिन मीणा नावाच्या व्यक्तीसोबत राहते. सीमा हैदरची यूपी एटीएसकडून चौकशी देखील करण्यात आली. त्यामुळे देशपातळीवर सीमा हैदर प्रकरण चर्चेत आलं होतं. अशातच आता सीमा हैदर पुन्हा चर्चेत आलीये त्याला कारण 12 वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेमुळे (Seema Haider In Answersheet)... नेमकं काय प्रकरण आहे, पाहुया...

सोशल मीडियावर एक उत्तरपत्रिका (Viral Answersheet) सध्या व्हायरल होत आहे. ही उत्तरपत्रिका राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील बगथर भागातील एका शाळेची असल्याचं समजतंय. या शाळेच्या 12 वीच्या परीक्षेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमा आणि त्याची लांबी यासंबंधीचा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर एका विद्यार्थ्यांने असं काही उत्तर लिहिलंय की, उत्तर वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल. 

झालं असं की, 12 वी च्या मुलांची राज्यशास्त्राची परीक्षा होती. प्रश्नपत्रिकेत भारत आणि पाकिस्तानची सीमा कोणती आहे आणि त्याची लांबी सांगा? असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर एका विद्यार्थ्याने मजेशीर उत्तर लिहिलं. 'दोन्ही देशांची सीमा हैदर आहे, त्याची उंची 5 फूट 6 इंच आहे. यावरून दोन्ही देशांमध्ये वाद सुरू आहे.', असं उत्तर विद्यार्थ्याने लिहिलं आहे. त्यामुळे आता पेपर चेक करणाऱ्या शिक्षिकाने देखील डोक्यावर हात मारून घेतलाय.

पाहा उत्तरपत्रिका

व्हायरल उत्तरपत्रिकेच्या शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कुमार यांनी या प्रकरणावर भाष्य केलंय. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या उत्तरपत्रिका आमच्या शाळेतील नाहीत, असं सुरेश कुमार यांनी सांगितलंय. दरम्यान, यूपी पोलीस सीमा हैदरच्या विरोधात हेरगिरीचा कोणताही पुरावा नसल्याची माहिती दिली होती. यूपी एटीएसने आपला अहवाल यूपीच्या गृह विभागाला सादर केल्यानंतर सीमा हैदरला क्लीन चिट देण्यात आली होती.