stock खरेदी करताय का? 'हे' 5 स्टॉक्स देतील तुम्हाला बंपर धमाका...

सध्या कंपन्यांचे सप्टेंबर 2022 या तिमाहीतील निकाल येत आहेत.

Updated: Nov 16, 2022, 05:29 PM IST
stock खरेदी करताय का? 'हे' 5 स्टॉक्स देतील तुम्हाला बंपर धमाका...   title=
stocks to buy

Stocks to Buy: सध्या स्टॉक खरेदी (Buying Stocks) करण्यासाठी आपल्याकडे अनेक पर्याय आहेत. किंबहूना आपल्याला सतत कुठल्या ना कुठल्या तरी स्टॉकचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला अशावेळी अपडेट राहणं गरजेचे असते. त्यामुळे सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीवर (Nifty) आपल्याला नजरही ठेवता येते. मंगळवारी बॅंकिंग(Banking) आणि कारच्या (Cars) शेअर्समध्ये (Shares) मोठ्या प्रमाणावर क्लोझिंग झाले. (stocks to buy these are the 5 stocks you can buys suggested by experts)

सध्या कंपन्यांचे सप्टेंबर 2022 या तिमाहीतील निकाल येत आहेत. तेव्हा गुंतवणूकदारांसाठी (Investors) आताच योग्य संधी आहे. सध्या अनेक शेअर बाजारात येऊ घातले आहेत. तेव्हा ब्रोकरेज हाऊसेसनं काही शेअर्समध्ये लॉन्ग टर्म गुंतवणूकीचा (Long Term Investment) सल्ला दिला आहे. सध्या असेच काही 5 शेअर्स बाजारात खुले झाले आहेत जे तुम्हाला 23 टक्क्यांहून अधिक परतावा (Returns) देऊ शकतात. 

सध्या जागतिक बाजारात तेजी आहे त्यामुळे सेन्सेक्सही उच्च पातळीवर क्लोझ झाला आहे. किरकोळ चलनवाढीचा दर कमी झाल्याने आणि सोबतच परदेशी गुंतवणूकदारांनी यावेळी गुंतवणूक (Investors) आणि स्टॉक्स (Stocks) खरेदी केल्यानं सध्या शेअर मार्केटमध्ये सकारात्मक वाढ दिसून येते आहे. 

हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा

दीपक नायट्रेट (Deepak Nitrite)

या शेअरची टार्गट प्राईझ (Target Price) रु 2,650 एवढी आहे. 15 नोव्हेंबर रोजी शेअरची किंमत 2,185 रुपये होती. गुंतवणूकदारांना प्रति शेअर (Per Share) 465 रुपये किंवा सुमारे 21 टक्के परतावा मिळू शकतो.  

कोफोर्ज (Coforage)
या शेअरची टार्गट प्राईस 4,630 रुपये आहे. काल या शेअरची किंमत 3,990 रुपये होती. गुंतवणूकदारांना प्रति शेअर 640 रुपये किंवा सुमारे 16 टक्के परतावा मिळू शकतो. 

प्रिझम जॉन्सन लि (Prizm Johnson)
या शेअरची टार्गेट प्राईझ रु. 152 आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी शेअरची किंमत रु. 124 होती. गुंतवणूकदारांना 28 रुपये प्रति शेअर किंवा सुमारे 23 टक्के परतावा मिळू शकतो.  

हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल

हिंदाल्को इंडस्ट्रीज  (Hindico Indutries)
तज्ञांनी या नव्या शेअरमध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गट प्राईझ पर शेअर 520 रूपये आहे. 15 नोव्हेंबर रोजी या शेअरची किंमत 456 रुपये होती. गुंतवणूकदारांना पर शेअर 64 रुपये किंवा 14 टक्के परतावा मिळू शकतो.

अपोलो हॉस्पिटल्स (Apollo Hospital)
तुम्ही म्हणाल हॉस्पिटल व्यवसायातून किती फायदा मिळेल. परंतु सध्या अपोलो हॉस्पिटल्स यंदाच्या बाजाराच्या यादीत टॉपवर आहे. तज्ञांनी या हॉस्पिटलचा शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअरची टार्गट प्राईझ 5,600 एवढी आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी अपोलो हॉस्पिटल्सच्या स्टॉकवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 15 नोव्हेंबर 2022 रोजी शेअरची किंमत 4,628 रुपये होती. गुंतवणूकदारांना या शेअरमधून 972 रुपये प्रति शेअर किंवा सुमारे 21 टक्के परतावा मिळू शकतो.

(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. Zee 24 तास याची पुष्ठी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्यावा.)