तुम्हाला ही SBI बँकेकडून 'हा' मेसेज आला तर लगेच सावध व्हा... कारण तो मेसेज बँकेचा नाही

स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून अनेक बँकिंग कामे करण्याची सुविधा देत आहे.

Updated: Aug 23, 2021, 08:42 AM IST
तुम्हाला ही SBI बँकेकडून 'हा' मेसेज आला तर लगेच सावध व्हा... कारण तो मेसेज बँकेचा नाही title=

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांना ऑनलाईन माध्यमातून अनेक बँकिंग कामे करण्याची सुविधा देत आहे. नवीन बँक खाते उघडण्यापासून पैसे हस्तांतरित करण्याचे काम ग्राहक ऑनलाइनद्वारे करू शकतात. यासह, ग्राहकांना अनेक सुविधा पुरवण्याबरोबरच बँक त्यांना जागरूक करण्याचे काम करते आणि वेळोवेळी त्यांना अपडेट करत राहते. परंतु, या दरम्यान अनेक सायबर क्राईम करणारे लोकांना बँकांसारखे संदेश पाठवून आणि त्यांच्या खात्यातून पैसे काढून लोकांची लूट करत आहेत.

आजकाल एसबीआयच्या अनेक ग्राहकांना पॅन कार्डसंदर्भात एक संदेश येत आहे, ज्यात एसबीआय योनो अॅप खाते निलंबित केल्याचे लोकांना सांगितले जात आहे. यावर बँकेने एक अलर्टही जारी केला आहे आणि बँकेने ग्राहकांना अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये असे कळवले आहे.

अशा परिस्थितीत तुम्ही सुद्धा जाणून घ्या की, हे लोक नक्की काय संदेश पाठवतात? ज्यापासून लोकांनी लांब राहिलं पाहिजे.

लोकांना 'हा' संदेश मिळत आहे

डीएर SBI यूझर, तुमचे SBI Yono खाते ब्लॉक केले गेले आहे. तुम्ही तुमचा पॅनकार्ड अपडेट करुन घ्या. पॅनकार्ड अपडेट करण्यासाठी आम्ही खाली एक लिंक देत आहेत त्यावर क्लिक करा आणि खाते अपडेट करा असे सांगून ग्राहकांना संदेश पाठवत आहेत. तुम्ही तुमचे पॅन कार्ड अपडेट करा.

परंतु त्यांनी पाठवलेली लिंक ही बँकेची नसते. जरी या वेबसाइटचे नाव एसबीआय सारखेच आहे, परंतु ती एसबीआयची नाही. त्यामुळे या लिंकला भेट देणे ग्राहकासाठी धोक्याचे ठरु शकते.

बँकेने काय सांगितले आहे?

ग्राहकांना असे मेसेज आल्यानंतर ग्राहकांनी ट्विटरच्या माध्यमातून बँकेला या विषयी माहिती दिली आहे. यावर बँकेने उत्तर दिले आहे की, 'ही माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही तुमच्या जागरूकतेचे कौतुक करतो. आम्ही आमच्या ग्राहकांना लिंक्स, कॉल, एसएमएस, यूजर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड नंबर, पिन, सीव्हीव्ही सारखे वैयक्तिक आणि बँकिंग तपशील विचारणाऱ्या ईमेलला प्रतिसाद न देण्याचा सल्ला देतो."

अशा परिस्थितीत, Phishing/Smishing/Vishing attempt बद्दलची तक्रार ग्राहक report.phishing@sbi.co.in या ईमेलवर करु शकतात. त्याव्यतिरिक्त तुम्ही हेल्पलाईन क्रमांक 155269 किंवा स्थानिक कायदा अंमलबजावणी एजन्सीला याबाबत माहिती देऊ शकता.

कशाकडे लक्ष द्यायचे?

पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त बँकांच्या बाबतीत अधिकृत स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीवर अवलंबून रहा. यासाठी, आपण प्रथम माहिती कोठून मिळवत आहात ते पहावे आणि कोणत्याही लिंकवर क्लिक करण्यापूर्वी ती लिंक पाहावी कारण गुन्हेगार समान नावांनी वेबसाइट तयार करत असतात.

त्यामुळे त्याची विशेष काळजी घ्या. तसेच, तुमची वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर करू नका आणि अज्ञात लिंकवर क्लिक करू नका.