Government Jobs: सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी खुशखबर, SSC करणार 42 हजार पदांची भरती

'अग्निपथ' योजनेवरून देशात गदारोळ होत असताना एसएससीने मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. 

Updated: Jun 20, 2022, 01:34 PM IST
Government Jobs: सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्यांसाठी खुशखबर, SSC करणार 42 हजार पदांची भरती title=

SSC Announces Government Jobs: 'अग्निपथ' योजनेवरून देशात गदारोळ होत असताना एसएससीने मोठ्या भरतीची घोषणा केली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) लवकरच 15,247 पदांसाठी नियुक्ती करणार आहे. याबाबतची प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाणार आहे. येत्या काही महिन्यांत विविध विभागांकडून याबाबतच्या जाहिराती जारी केल्या जातील. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (पीआयबी) केलेल्या ट्वीटने याची पुष्टी केली आहे.

पीआयबीचं ट्वीट 

पीआयबीने ट्वीटमध्ये म्हटले आहे की, डिसेंबर 2022 पूर्वी 42,000 नियुक्त्या पूर्ण केल्या जातील. SSC ने आपल्या आगामी परीक्षांसाठी 67,768 रिक्त जागा त्वरित भरण्याची योजना तयार केली आहे. यामुळे सरकारी नोकरीसाठी इच्छुकांचे मनोबल नक्कीच उंचावेल, असं तज्ज्ञांचं मत आहे. कारण या सर्व रिक्त जागा वर्ष संपण्यापूर्वी भरण्याचे नियोजन आहे.

पंतप्रधान मोदींनी केली होती घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच घोषणा केली होती की येत्या दीड वर्षात केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय आणि विभागांमध्ये 10 लाख पदांसाठी भरती प्रक्रिया केली जाईल. अशा स्थितीत सर्वच विभागांनी रिक्त पदांवरील भरती पूर्ण करण्याची तयारी सुरू केली आहे.