इस्लामाबाद : मीम्समधून भारतात कायम चर्चेत असणारे पाकिस्तानचे टीव्ही होस्ट आणि खासदार डॉ. आमिर लियाकत (Aamir Liaquat) यांचे काही दिवसांपूर्वीचं निधन झाले होते. या निधनानंतर मीम्स विश्वात शोककळा पसरली होती. लियाकत यांच्या निधनानंतर आता त्याच्या मृत्यूवरून पाकिस्तानात पून्हा एकदा वाद सुरू झालाय.कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर हा वाद सुरु झाला आहे. नेमका हा वाद जाणून घेऊयात. (pakistan court orders famour memer aamir liaquat hussains post morterm)
आमिर लियाकत (Aamir Liaquat) यांचं आयुष्य जेवढं वादात सापडलं होतं, तेवढीच त्यांच्या मृत्यूचीही चर्चा होतेय. लियाकत यांच्या मृत्यूवरून अनेक वाद झाले आहेत. मृत्यूपूर्वी ते डिप्रेशनमध्ये असल्याची चर्चा होती. मात्र आता आणखीण एक मोठा वाद सुरु झालाय. आता पाकिस्तानी न्यायालयाने लियाकतच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्याचे आदेश दिलेत. त्यासाठी लियाकतचा मृतदेह कबरीतून बाहेर काढण्यात येणार आहे.अब्दुल अहद नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या याचिकेवर आदेश देताना न्यायालयाने हा निर्णय दिलाय.
आदेशात काय?
आमीर लियाकतच्या (Aamir Liaquat) मृत्यूचे कारण शोधण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमार्टम करणे आवश्यक असल्याचे याचिकेत म्हटले आहे. यानंतर कोर्टाने अमीर लियाकतचे पोस्टमॉर्टम करण्याचे आदेश दिले.
दरम्यान न्यायालयाच्या या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. अनेक पाकिस्तानी सेलिब्रिटी याला विरोध केला आहे.
पाकिस्तानी सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया
अमीर लियाकतच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमला विरोध करणाऱ्यांमध्ये पाकिस्तानी अभिनेत्री उषाना शाहचाही समावेश आहे. उषानाने ट्विट करून सांगितले की, मृतदेह कबरीतून बाहेर काढल्याने तिच्या मुलांना आणखी त्रास होईल. त्यांनी आधीच खूप त्रास सहन केला आहे.
ज्येष्ठ पाकिस्तानी अभिनेत्री बुशरा अन्सारी यांनी ट्विट करत न्यायालयाच्या आदेशाला विरोध केला आहे. “सोशल मीडिया ही सर्वात मोठी शक्ती आहे. न्यायालयाच्या आदेशाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, जे लोक जग सोडून गेले आहेत त्यांचा अधिक अपमान होऊ नये. अमीर लियाकतची मुलांनी आधीच खुप सहन केले आहे. या आदेशाने त्यांना अधिक त्रास होईल.
पाकिस्तानचे टीव्ही होस्ट वसीम बदामी यांनीही आमिर लियाकतचे पोस्टमॉर्टम करण्याच्या कोर्टाच्या आदेशावर चिंता व्यक्त केली. लियाकतचे शवविच्छेदन न करताच दफन करण्यात आल्याचे बदामी यांनी ट्विट केले आहे. त्यांच्या मुलांना जास्त त्रास देऊ नका, असेही त्यांनी म्हटले आहे.