गणिताच्या 'या' प्रश्नावर लहान मुलाचे हे उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्, एकदा video पाहाच

एका लहान मुलांचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. 

Updated: Aug 14, 2022, 05:06 PM IST
 गणिताच्या 'या' प्रश्नावर लहान मुलाचे हे उत्तर ऐकून तुम्हीही व्हाल अवाक्, एकदा video पाहाच title=

Small Kid Viral Video: लहान मुलांचं विश्वच निराळं असतं. त्यांच्या इवल्याश्या मनात असंख्य प्रश्न निर्माण होत राहतात आणि त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी त्यांच्या पालकांना नेहमीच तत्पर राहावं लागतं. पण कित्येकदा असं होतं की त्यांची उत्तरं ऐकून आपणही अवाक होऊन जातो. 

अशाच एका लहान मुलाचा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. तो सगळीकडे प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर युझर्सच्या पसंतीस उतरत आहे. व्हिडीओतल्या लहान मुलाला एक प्रश्न विचारण्यात येतो. त्यावर त्याचे निरागस उत्तर ऐकून अनेकांनी त्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पाडला. हा व्हिडीओ अनेकांनी सोशल मीडियावर शेअरही केला आहे. 

या व्हिडीओतल्या मुलाला एक प्रश्न विचारण्यात येतो की गणित शिकण्याचा फायदा काय असतो. तेव्हा त्याने दिलेलं उत्तर ऐकून सगळेच आवाक झाले आहेत. परंतु त्याच्या उत्तरापेक्षा त्याने ज्या निरागसपणे ते उत्तर दिलं हे पाहूनच युझर्स त्याच्यावर फिदा झाले आहेत. त्याचा क्युटनेस सध्या सगळ्यांची मनं जिंकून घेतो आहे. 

त्याला विचारलेल्या प्रश्नावर त्याने उत्तर दिलं की, ''गणित शिकण्याचा फायदाच काय जर मोजायला पैसेच नसतील''. त्याचे हे गंमतीशीर उत्तर ऐकून एकच हशा सुटला आहे. या व्हिडीओखाली सगळ्यांनीच क्यूट आणि हार्टचे इमोजीच टाकले आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

k)

आत्तापर्यंत 2 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एवढेच नाही तर त्याला 94 हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे.