Anand Mahindra : महिंद्रा अँड महिंद्रा ग्रुपचे चेअरमन प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा (Anand Mahindra) हे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते अनेकदा प्रेरणादायी, मजेदार किंवा आश्चर्यकारक व्हिडिओ आणि फोटो आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर करत असतात. यावर त्यांचे फॉलोअर्स त्यावर प्रश्नही विचारात आणि प्रतिक्रियाही देतात. आनंद महिंद्रांही सक्रीयपणे या प्रश्नांना उत्तरे देत असतात.
त्यामुळे काही वेळातच त्याच्या पोस्टही व्हायरल होतात. अशीच एक पोस्ट आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर (twitter) शेअर केली आहे. आनंद महिंद्रा यांनी स्पेनमधला (spain) फोटो शेअर केला आहे. हा फोटो त्यांनीच काढला असून तो 47 वर्षांपूर्वीचा आहे. आनंद महिंद्रा यांच्या फोटोचे त्यांचे फॉलोअर्स कौतुक करत आहेत.
आनंद महिंद्रा यांनी स्वत: 1975 मध्ये घेतलेला एक फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. "हा फोटो 1975 मध्ये टोलेडो, स्पेनमध्ये घेतला होता, जेव्हा मी फोटोग्राफीचा प्रोजेक्ट करत होतो. या फोटोची आता आठवण झाली कारण जगभरात 5G नेटवर्क आले असून उत्कृष्ट कम्युनिकेशन नेटवर्क आल्यापासून शब्दांच्या माध्यमातून त्याचा प्रचार केला जाईल आणि लोक त्याच्याशी जोडले जातील, असे कॅप्शन त्यांनी फोटोसोबत लिहीले आहे.
Took this pic in Toledo, Spain in 1975 when I was doing a student photography project. As 5G networks roll out around the world, this reminded me that the most efficient communication network will always be word of mouth… pic.twitter.com/jWj6NJCsNx
— anand mahindra (@anandmahindra) August 13, 2022
आनंद महिंद्रा यांनी काढलेल्या फोटोचे सोशल मीडियावर जोरदार कौतुक करण्यात येत आहे. त्यांच्या या पोस्टला आतापर्यंत पाच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. ही संख्या झपाट्याने वाढतच आहे. त्याच वेळी, 200 हून अधिक लोकांनी आता ही पोस्ट रिट्विट केली आहे.