जम्मू काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा, यात दोन पाकिस्तानी

Jammu and Kashmir Terrorists : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे.  

Updated: Dec 30, 2021, 12:10 PM IST
जम्मू काश्मीरमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा, यात दोन पाकिस्तानी title=
संग्रहित छाया

नवी दिल्ली : Jammu and Kashmir Terrorists : जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 24 तासांत 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. कुलगाम आणि अनंतनागमध्ये झालेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत प्रत्येकी 3 दहशतवादी ठार मारण्यात आले. मोठ्या संख्येने शस्त्रही जप्त करण्यात आली. सर्व दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. यातला एक दहशतवादी पाकिस्तानी होता. (Six Terrorists of Proscribed Terror outfit JeM killed in two separate Encounters)

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग आणि जिल्ह्यांमध्ये सुरक्षा दलांसोबतच्या दोन वेगवेगळ्या लढतीत 6 दहशतवादी ठार करण्यात आले. यात दोन पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (Six terrorists were killed in two separate engagements with security forces in Anantnag and districts of Jammu and Kashmir)

दहशतवाद्यांचा संबंध जैश-ए-मोहम्मद (JeM) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेशी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मारल्या गेलेल्या चार दहशतवाद्यांची आतापर्यंत ओळख पटली आहे. दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवादी आहेत. अन्य दोन दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

 दहशतवादी संघटनेचे 6  दहशतवादी दोन वेगवेगळ्या चकमकीत ठार झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी 4 दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. यात दोन पाकिस्तानी आणि दोन स्थानिक दहशतवादी आहेत. इतर दोन दहशतवाद्यांची ओळख पटवली जात आहे. आमच्यासाठी मोठे यश आहे, अशी माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली. याबाबत काश्मीर झोनने  IGP विजय कुमार यांचा दुजोरा देत ट्विट केले आहे.