Stock Market Update Today : काय आहेत आजचे ग्लोबल संकेत; आशियाई बाजाराचा मूड कसा? ट्रेंडिंगपूर्वी वाचा

 Stock Market Update Today देशातील शेअर बाजारासाठी आज म्हणजेच गुरुवारी संमिश्र कल दिसून येऊ शकतात. 

Updated: Dec 30, 2021, 09:17 AM IST
Stock Market Update Today : काय आहेत आजचे ग्लोबल संकेत; आशियाई बाजाराचा मूड कसा? ट्रेंडिंगपूर्वी वाचा  title=

मुंबई : देशातील शेअर बाजारासाठी आज म्हणजेच गुरुवारी संमिश्र कल दिसून येऊ शकतात. आज आशियाई बाजारात संमिश्र कल दिसत आहेत. आज डाऊ फ्युचर्समधील व्यवहार देखील स्थिर होते. बुधवारी डाऊ जोन्स आणि S&P 500 निर्देशांक विक्रमी अंकांवर होते. 

तर S&P 500 निर्देशांक 7 अंकांनी वाढून 4,793.06 वर बंद झाला.  कोविड 19 च्या वाढत्या रुग्णांमुळे गुंतवणूकदार सावध आहेत. दुसरीकडे, ग्राहक स्टॉकमध्ये वाढ झाली आहे. आशियाई बाजारांबद्दल बोलायचे झाल्यास, SGX निफ्टी तेजीत आहे, तर Nikkei 225 आणि Straight Times च्या व्यवहारात दबाव दिसून आला. हँग सेंगमध्येही घसरण नोंदवली गेली. तर कोस्पी, तैवान वेटेड आणि शांघाय कंपोझिटच्या व्यवहारात तेजी नोंदवली गेली.

चर्चेतील शेअर

आयुर्विमा महामंडळाने Bharat Petroleum Corporationमधील 2.019 टक्के भागभांडवल खुल्या बाजारातील व्यवहाराद्वारे (open market transaction) विकत घेतले आहे.

लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची भारत पेट्रोलिएममधील भागिदारी 5.01 टक्क्यांवरून 7.03 टक्क्यांवर पोहोचली आहे.

बँकांची बॅलेंसशीट मजबूत

RBI ने फाइनेंशियल स्टेबिलिटी रिपोर्टमध्ये बँकांची बॅलेंसशीट मजबूत असल्याचे म्हटले गेले आहे. परंतू रिपोर्टमध्ये ओमिक्रॉनने आर्थिक सुधारणा मंदावल्याबद्दल चिंतादेखील व्यक्त करण्यात आली आहे.

डिसेंबर फ्युचर्स एक्सपायरी

आज डिसेंबर फ्युचर्स सिरीज एक्स्पायर होईल. उद्या जानेवारीच्या मालिकेतून, AB कॅपिटल, IDFC, GNFC, NBCC आणि बलरामपूर चिनी सह 10 नवीन शेअर्स F&O मध्ये प्रवेश करतील.

F&O अंतर्गत NSE वर बंदी

आज म्हणजेच 30 डिसेंबर रोजी NSE वर F&O अंतर्गत 3 शेअर्समध्ये ट्रेडिंग बंदी असेल. या 3 शेअर्समध्ये इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स, व्होडाफोन आयडिया आणि आरबीएल बँक यांचा समावेश आहे.