Shraddha Murder Case : आधी चॉपर मग करवत आणि ब्लेड! हैवानी आफताबने 'या' ठिकाणी फेकली हत्यारं

Shraddha Murder : दिल्ली पोलिसांना मेहरौलीच्या जंगलातून एक जबडा आणि काही हाडेही सापडली आहे. दंतवैद्यांनी या जबड्याची तपासणी सुरू केली आहे. 

Updated: Nov 22, 2022, 10:50 AM IST
Shraddha Murder Case : आधी चॉपर मग करवत आणि ब्लेड! हैवानी आफताबने 'या' ठिकाणी फेकली हत्यारं  title=
Aftab Punawala gave information to the police about the weapon used to kill Shraddha

Shraddha Walker Murder Case: सध्या देशभरात श्रद्धा हत्येप्रकरणी तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात आरोपी आफताब पूनावाला या तरुणानं त्याच्या लिव्ह-इन पार्टनर श्रद्धाची निर्घृण हत्या केली आणि देशभरात एकच आक्रोश उठला. श्रद्धा हत्येप्रकरणानंतर चौकशीदरम्यान श्रद्धाची हत्या (Murder mystery) करण्यासाठी वापरलेली हत्यारं आफताब पुनावाला (Aftab Poonawala) याने नेमकी कुठे फेकली, याचा शोध पोलीस घेत असताना अखेर याबाबत आफताब पुनावाला यानेच पोलिसांना (delhi Police) महत्त्वाची माहिती दिली.  चौकशीदरम्यान आफताबने सांगितले की,  गुरुग्राममध्ये एका झाडीत श्रद्धाची हत्या करण्यासाठी वापरलेली करवत, चॉपर आणि ब्लेड फेकले आहेत. तसेच महरौली येथे 100 फूट अंतरावर असलेल्या एका कचऱ्याच्या डब्यात त्याने या गोष्टी फेकल्या.     

श्रद्धा खून प्रकरणानंतर लिव्ह इन रिलेशनशिपवर प्रश्न?

श्रद्धा हत्येप्रकरणानंतर (Shraddha Murder Case) दिल्ली पोलिसांचं पथक याआधी दोन वेळा गुरुग्राम येथील झाडीत शोध घेऊन झालंय. 18 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी याच झाडीत तपास केला. दरम्यान, 19 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीनेही शोध घेतला. पण पोलिसांना काहीच आढळून आलं नव्हतं.   दिल्ली पोलिसांना (Delhi Police Crime) मेहरौलीच्या जंगलातून एक जबडा आणि काही हाडेही मिळाली आहेत. दिल्ली पोलिसांनी त्याला डेंटिस्टकडे पाठवले असून हा जबडा श्रद्धाचा आहे की नाही हे कळू शकेल. दंतवैद्यांनी या जबड्याची तपासणी सुरू केली आहे. दुसरीकडे, दिल्ली पोलीस मैदानगढीचा तलाव साफ करताना या चौकशीदरम्यान आफताबने श्रद्धाचे डोके आणि शरीराचे काही अवयव फेकल्याची कबुली दिली.

वाचा : 'या' कारणामुळे आफताब करायचा श्रद्धाला बेदम मारहाण; नालासोपाऱ्यातील महिलेने केला खुलासा

दंतचिकित्सकाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, जबड्याचा फोटो घेऊन पोलिस त्याच्यापर्यंत पोहोचले होते. श्रद्धाचा एक्स-रे मुंबईतील (Mumbai Crime) एका डॉक्टरने रूट कॅनॉलमध्ये केल्यावर डेंटिस्टने पोलिसांना आणण्यास सांगितले आहे. एक्स-रे शिवाय ओळख पटणे कठीण असल्याची माहिती डेंटिस्टकडून देण्यात आली आहे. 

आफताबच्या पॉलीग्राफ चाचणीसाठी परवानगी

दिल्ली पोलिसांना आरोपी आफताबची पॉलिग्राफ चाचणी करण्याची परवानगी न्यायालयाकडून मिळाली आहे. मंगळवारी संपत असलेल्या आफताबच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी दिल्ली पोलिस करणार असल्याचे मानले जात आहे. प्रत्यक्षात हत्येत वापरलेले हत्यार, श्रद्धाच्या मृतदेहाचा उर्वरित भाग यासारखे महत्त्वाचे पुरावे अद्याप पोलिसांना मिळालेले नाहीत. दिल्लीतील अनेक भागात शोध सुरू असून मैदानगढीचा तलावही रिकामा केला जात आहे.

नार्को चाचणीपूर्वी पॉलिग्राफ चाचणी केली जाईल

सोमवारी आफताबची नार्को चाचणी (Narco test) होऊ शकली नाही. वास्तविक, नार्को चाचणीपूर्वी आफताबची पॉलीग्राफ (Polygraph) चाचणी करावी लागते. याआधी गुरुवारी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना 5 दिवसांत आफताबची नार्को टेस्ट करण्याचे आदेश दिले होते. सोमवारी दिल्ली पोलिसांनी आफताबची पॉलीग्राफ चाचणी करण्यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली. आफताबनेही त्याला संमती दिल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांचे जबाब नोंदवले आहेत

याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 11 जणांचे जबाब नोंदवले आहेत. यापैकी दोन लोक असे आहेत ज्यांनी 2020 मध्ये आफताबने श्रद्धाला मारहाण केल्यानंतर तिला मदत केली होती.