जेलमध्ये 26 कैद्यांना HIV; 70 महिला कैद्यांची होणार तपासणी

जेल प्रशासन हादरलं! 26 कैद्यांना HIV ची लागण   

Updated: Sep 6, 2022, 01:20 PM IST
जेलमध्ये 26 कैद्यांना HIV; 70 महिला कैद्यांची होणार तपासणी title=

मुंबई : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बाराबंकी येथील तुरुंगात 26 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. 26 कैद्यांना एचआयव्हीची लागण झाल्याचं कळताच जेल प्रशासन हादरलं आहे. कारागृहात पॉझिटिव्ह आढळलेल्या कैद्यांची आरोग्य विभागाच्या पथकाने ( team of health department) तीन टप्प्यात शिबिरं लावून तपासणी केली. लखनऊमधील राम मनोहर लोहिया रुग्णालयात या पॉझिटिव्ह कैद्यांची एआरटी थेरपी सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. महत्त्वाचं म्हणजे 70 महिला कैद्यांची अद्याप चाचणी व्हायची आहे.  (in Barabanki Jail 26 prisoners found hiv positive)

मिळालेल्या माहितीनुसार,  बाराबंकी जिल्हा कारागृहात 10 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान कैद्यांची तपासणी करण्यात आली.  यासाठी आरोग्य विभागाने 3 टप्प्यांत शिबिरे लावून एचआयव्ही तपासणी (HIV testing) केल्यानंतर अहवालात 26 कैदी एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

26 कैद्यांना एचआयव्ही झाली असल्याची बाब उघडकीस आल्यानंतर कारागृह प्रशासन (prison administration) सतर्क झालं आहे.  26 कैद्यांचा रिपोर्ट आल्यानंतर अन्य कैद्यांना त्यांच्यापासून वेगळं ठेवण्यात आलं आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार 200 कैद्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 26 कैद्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दुसरीकडे 70 महिला कैद्यांची एचआयव्ही  चाचणी होणार आहे. (70 female prisoners will be tested for HIV)

एचआयव्ही पॉझिटिव्ह (HIV positive) आढळलेल्या  कैद्यांवर लखनऊच्या लोहिया रुग्णालयात एआरटी (अँटी-रेट्रोव्हायरल थेरपी) सुरू आहे. आता नवीन 24 रुग्णांवर एआरटी करण्यात येणार आहे.

जिल्हा कारागृहात एकूण 3300 कैदी आहेत. या प्रकरणी जेलर आलोक यांनी सांगितले की, नेहमीच्या तपासणीत 26 कैद्यी एचआयव्ही आढळून आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

याबाबत मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अवधेश यादव (Dr. Awadhesh Yadav) म्हणाले की, सध्या आम्ही कैद्यांवर उपचार करण्यावर अधिक लक्ष देत आहोत. यातील काही कैदी वृद्धही आहेत. ज्या कैद्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, त्यांच्या कुटुंबीयांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली आहे. त्या कैद्यांची विशेष काळजी घेतली जात आहे.