आंधळं प्रेम! रेल्वे पटरीवर बोलत बसली अन् तेवढ्यात आली ट्रेन...पाहा Shocking Video

Girl on railway Line: सध्या तुमच्या हातात असलेल्या फोनमुळे अनेकांचं आयुष्य व्यस्थ झालंय. एखादं जोडपं (Couple) प्रेमात पडलं तर तासंतास फोनवर बोलताना पहायला मिळतं. ना वेळेचं भान राहत...ना ठिकाणाचं.... 

Updated: Oct 28, 2022, 08:47 PM IST
आंधळं प्रेम! रेल्वे पटरीवर बोलत बसली अन् तेवढ्यात आली ट्रेन...पाहा Shocking Video title=
Shocking Video Of Girl on railway Line

Shocking Video Of Girl on railway Line: सध्या तुमच्या हातात असलेल्या फोनमुळे अनेकांचं आयुष्य व्यस्थ झालंय. एखादं जोडपं (Couple) प्रेमात पडलं तर तासंतास फोनवर बोलताना पहायला मिळतं. ना वेळेचं भान राहत...ना ठिकाणाचं.... असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Shocking Video) होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

अनेकदा फोनवर (Mobile) बोलताना आपण काय करतोय, याचं भान राहत नाही. लक्ष विचलित झाल्याने मोठमोठ्या दुर्घटना घडतात. अशातच एका मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) झाल्याचं पहायला मिळतंय. रेल्वे अंगावरून गेली तरीही पोरगी जिवंत राहिल्याने अनेकांच्या अंगावर काटा आल्याचं पहायला मिळतंय.

आणखी वाचा - LIVE कार्यक्रमात पोटधरून हसू लागला टीव्ही अँकर, तुफान व्हायरल होतोय Video

व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये एक लाल ड्रेस घातलेली मुलगी दिसत आहे. जी आरामात फोनवर बोलत रेल्वेच्या पटरीवर बसलेली (Girl on railway Line) असते. त्यावेळी अचानक ट्रेन आली तरीही ती उठली नाही. तिच्या अंगावरून शेवटी ट्रेन जाते. मात्र, तरीही मुलीला काही इजा झाली नाही.

पाहा व्हिडीओ- 

ट्रेन गेल्यानंतर मुलगी पुन्हा उठून बसते. त्यावेळी एका व्यक्तीने हा व्हिडीओ शूट केला. ट्रेन गेल्यानंतर देखील मुलीने फोन ठेवला नाही आणि त्यानंतर सतत तिचा फोन सुरू होता. व्हिडीओ शूट करणाऱ्या व्यक्तीने मुलीला बोलावून घेतलं आणि झाप झाप झापलं. त्यानंतर मुलीने त्याठिकाणहून पळ काढला.

दरम्यान, हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा (Deepanshu Kabra) यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केलाय. याला आतापर्यंत 75 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्सही पाहायला मिळत आहेत.