मुंबई : सोन्याचे भाव गेल्या काही काळापासून एका ठराविक किंमतींच्या रेंजमध्ये फिरत आहेत. 10 ग्रॅमची सोन्याची किंमत 47 हजार ते 48 हजारांच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत, असा अंदाज लावला जात आहे की, येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतीत पुन्हा वाढ दिसून येईल. मात्र, देशांतर्गत बाजारात त्याची हालचाल मंद आहे.
दिवाळीपर्यंत सोने 52 हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. दरम्यान, स्पेनचा Quadriga Igneo fund सांभाळणाऱ्या डिएगो पॅरिला (Diego parrilla) यांच्या एक अंदाजाने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
डिएगोचा असा विश्वास आहे की, पुढील 3 ते 5 वर्षांमध्ये सोन्याची किंमत 3 हजार ते 5 हजार डॉलर प्रति औंस पर्यंत वाढू शकते. याचा अर्थ, पुढील तीन वर्षांत, भारतात त्याची किंमत 78 हजार 690 रुपयांपासून ते 1 लाख 31 हजार 140 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे ही बातमी गुंतवणूकदारांसाठी चांगली आहे. पण सोनं खरेदी करणाऱ्या सामान्य माणसासाठी ही धक्कादायक बातमी आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून, सोने सुमारे 47 हजार रुपये आहे (Gold latest price). दुसरीकडे, USB ग्रुपच्या रणनीतिकारांचे म्हणणे आहे की, या वर्षी सोने आणखी कमी होईल आणि ते 44 हजार 600 पर्यंत पोहोचू शकते. ही घट 2022 मध्येही कायम राहील.
परंतु असे असले तरी Quadriga Igneo fund फंड व्यवस्थापक त्यांच्या अंदाजावर ठाम आहेत.
जगभरातील कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या दरम्यान सोने गेल्या वर्षी 2 हजार 075.47 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. तथापि, काही काळासाठी ते सुमारे 1800 डॉलर प्रति औंस फिरत आहे. ते म्हणाले की, मॉनिटरी आणि फिस्कल पॉलिसीमुळे (Fiscal policies) भविष्यात होणाऱ्या दीर्घकालीन नुकसानीबाबत फारशी जागरूकता नाही.
त्यामुळे जाणूनबुजून व्याजदर कमी ठेवल्याने मालमत्तेचे बबल तयार होतात जे फुटू शकतात आणि ज्यामुळे प्रचंड नुकसान होऊ शकते, ज्यामुळे मध्यवर्ती बँकांना अशा परिस्थितींना सामोरं जाणे आणि सामान्य स्थितीत येणे कठीण होते.
फंड मॅनेजर डिएगो (Diego parrilla) चे असे म्हणणे आहे की, अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने धोरण कडक करण्याचे संकेत दिल्यानंतर जून 2021 मध्ये सोन्याच्या किमतीत घसरण झाली. डिएगोचा असा विश्वास आहे की, मध्यवर्ती बँकांचे परिस्थितीवर तसे नियंत्रण नाही जसे लोकं विचार करत आहेत. "मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे की, पुढील 3 ते 5 वर्षांमध्ये सोन्याची किंमत 5 हजार डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचू शकते."
Quadriga Igneo fundचे फंड मॅनेजर दिएगो यांनीही त्यांच्या अंदाजामागील ठोस कारण दिले आहे. डिएगोचा असा विश्वास आहे की, सोन्याचे दर नवीन उच्चांक गाठू शकतात. कारण, गुंतवणूकदारांना अनेक देशांमध्ये दिल्या जाणाऱ्या मदत पॅकेजमुळे मध्यवर्ती बँकांना येणाऱ्या अडचणींची जाणीव होत नाही.
हे तेच डिएगो आहे, ज्यांनी 2016 मध्ये भाकीत केले होते की, सोने 5 वर्षात विक्रमी उच्चांक गाठेल आणि आताची परिस्थिती पाहाता त्यांचे भाकीत खरे ठरले आहे असेच म्हणावे लागेल. वर्ष 2020 मध्ये, कोरोना विषाणू दरम्यान, सोन्याने 56 हजार 200 च्या विक्रमी किंमतीला स्पर्श केला होता.