PVR, INOX, Lemon Tree Hotels, L&T Tech हे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर; भरपूर पैसा कमाईची संधी

शेअर बाजारात गुंतवणूक करून दमदार रिटर्न्स मिळवण्यासाठी परफेक्ट शेअर्सची निवड गरजेची असते. 

Updated: Oct 26, 2021, 01:00 PM IST
PVR, INOX, Lemon Tree Hotels, L&T Tech हे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर; भरपूर पैसा कमाईची संधी title=

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करून दमदार रिटर्न्स मिळवण्यासाठी परफेक्ट शेअर्सची निवड गरजेची असते. बाजाराच्या चढ उतारामध्ये देखील क्वॉलिटी शेअर निवडून तु्म्ही चांगला रिटर्न मिळवू शकता. सध्या अनेक कंपन्या सप्टेंबर तिमाहीचा निकाल जारी करीत आहेत. ज्या आधारे विविध ब्रोकरेज हाऊस गुंतवणूकीसाठी सल्ला दिला आहे.

PVR
लिडिंग मल्टिप्लेक्स चैन PVR च्या शेअर्समध्ये ब्रोकरेज हाऊस शेअरखानने गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअरसाठी 1900 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्या शेअर 1,755.85 रुपयांवर होता. कोरोना संसर्ग कमी झाल्यानंतर आता मल्टिप्लेक्स सुरू होत आहेत. त्यामुळे कंपनीला याचा नक्कीच फायदा होणार आहे. सप्टेंबर तिमाही दरम्यान, कंपनीने आपला तोटा कमी केला आहे. 

INOX LEISURE (INOX)
INOX मध्ये ब्रोकरेज हाऊस ICICI सेक्युरिटीजने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे.  शेअरसाठी 495 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. 

Lemon Tree Hotels 
ब्रोकरेज हाऊस मोतीलाल ओस्वाल यांनी Lemon Tree Hotels मध्ये गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. या शेअरसाठी त्यांनी 70 रुपयांचे टार्गेट निश्चित केले आहे. सध्या शेअरची किंमत 49.50 रुपये आहे. कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल केल्यानंतर पर्यंटन क्षेत्राला उभारी मिळणार आहे. त्याचा फायदा कंपनीला मिळू शकतो.

L&T Technology Services
एल ऍंड टी टेक्नॉलॉजीमध्ये शेअरखानने गुंतवणूकीचा सल्ला दिला आहे. त्यासाठी 5900 रुपयांचे टार्गेट देण्यात आले आहे. सध्या शेअरची किंमत 4523 रुपये असून टार्गेटचा पूर्ण झाल्यास गुंतवणूकदारांना 31 टक्क्यांचा परतावा मिळू शकतो.