मुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या पत्रकार परिषदेदरम्यान शेअर बाजाराने जबरदस्त उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने १००० अंकांनी मजबूत होत ३१ हजार ५०० अंकांचा टप्पा ओलांडला, तर निफ्टीने सुमारे २५९ अंकांची वाढला आणि ९३०० वर पोहोचला.
रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या पत्रकार परिषदेत गुंतवणूकदारांना काही मोठ्या घोषणांची अपेक्षा आहे. लॉकडाऊनमधील ही दुसरी वेळ आहे जेव्हा शक्तीकांत दास मीडियाशी बोलत आहेत. यापूर्वी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी 27 मार्च रोजी पत्रकार परिषद घेतली होती. त्यांनी रेपो दरात 0.75 टक्क्यांनी घट करण्याची घोषणा केली.
या आठवड्यात शेयर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाला. गुरुवार सेंसेक्स 222.80 अंकांनी वाढून 30,602.61 झाला. तर निफ्टी 67.50 अंकांनी वाढून 8,992.80 अंकावर बंद झाला.
- बुधवारी सेंसेक्स 1,346 अंकांच्या दरम्यान वर खाली झाल्यानंतर शेवटी 310 अंकांनी 1.01 टक्के नुकसान होत 30,379 अंकावर बंद झाला. निफ्टी 68.55 अंकांनी कमी होत 8,925.30 वर बंद झाला.
- मंगळवारी 14 एप्रिलला शेअर बाजार बंद होता.
- सोमवारी सेंसेक्स 469.60 अंकांनी पडला आणि 30,690.02 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 118.05 अंकाने पडला आणि 8,993.85 अंकावर बंद झाला.