नवी दिल्ली : आरबीआयचे (RBI) १५० कर्मचारी क्वारंटाईच्या वातावरणात काम करीत आहेत. २७ मार्चपासून भारतीय अर्थव्यवस्थेत घसरण होत आली आहे. भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज १.९ टक्के राहण्याचा अंदाज आहे. असे असले तरी कोरोनाच्या सावटाखाली होणारे नुकसान रोखण्याच्या मोहिमेवर काम सुरु आहे, अशी माहिती आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
#BreakingNews | कोरोना से होने वाले नुकसान को रोकने के मिशन पर काम जारी: शक्तिकांत दास, RBI गवर्नर #ZeeBusinessNumber1
@AnilSinghvi_ #ShaktikantaDas #RBI pic.twitter.com/69GG1yEluJ— Zee Business (@ZeeBusiness) April 17, 2020
देशातील आर्थिक संकटावर आरबीआयचे बारीक लक्ष असल्याचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटले आहे. कोरोनामुळे जगभरात मंदीचे सावट आहे. मात्र इतर देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली आहे, असे ते म्हणालेत. अर्थव्यवस्था सावराला मदत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरुच आहेत, असेही ते म्हणालेत. तसेच देशातील मंदीशी लढण्याचा प्रयत्न आरबीआय करत आहे. त्यासाठी लघु बँकिंग क्षेत्रासाठी ५० हजार कोटी देण्याची घोषणा त्यांनी केली. देशाकडे ११ महिने पुरेल इतके परकीय चलन उपलब्ध आहे. नाबार्डला २५ हजार कोटींची मदत घोषणा केली. तसेच आरबीआयकडून रिव्हर्स रेपो दर ४ टक्क्यांवरुन ३.७५ वर आणला आहे. त्यामुळे बँक ठेवीदारांचे नुकसान होण्यार आहे. कारण ठेवीवरील व्याज कमी होण्याचा धोका आहे.
#BreakingNews | नाबार्ड, NHB, SIDBI को रु50,000 करोड़ की वित्तीय मदद: शक्तिकांत दास, RBI गवर्नर #ZeeBusinessNumber1 @AnilSinghvi_ #ShaktikantaDas #RBI pic.twitter.com/NeknmtmidF
— Zee Business (@ZeeBusiness) April 17, 2020
कोरोनाच्या संकटामुळे निर्यातीत घट झालेली आहे, निर्यातीत ३४ टक्क्यांची घट होण्याचा अंदाज आहे. देशभरातील विजेची मागणी २५ ते ३० टक्क्यांनी घटली असून कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात ऑटोमोबाइल क्षेत्रातील विक्रीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. मात्र, बँका त्यांचे काम उत्तम प्रकारे करत आहेत. कोरोनाशी लढा देण्यास आम्ही सुसज्ज आहोत, असे ते म्हणालेत.
#BreakingNews | 91% क्षमता के साथ ATM काम कर रहे हैं, 10 अप्रैल तक विदेशी मुद्रा भंडार $47,650 करोड़: शक्तिकांत दास, RBI गवर्नर #ZeeBusinessNumber1 @AnilSinghvi_ #ShaktikantaDas #RBI pic.twitter.com/r6ubbNb18y
— Zee Business (@ZeeBusiness) April 17, 2020
- आरबीआयकडून रिव्हर्स रेपो दर ४ टक्क्यांवरुन ३.७५ वर
- नाबार्डला २५ हजार कोटींची मदत
- देशातील मंदीशी लढण्याचा प्रयत्न आरबीआय करत आहे
- लघु बँकिंग क्षेत्रासाठी ५० हजार कोटी
- देशाकडे ११ महिने पुरेल इतके परकीय चलन उपलब्ध आहे
- मोबाईल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगही सुरु आहे
- देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा