Share Market | शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच; सेसेंक्स 1000 अंकांनी आदळला

 शेअर बाजार उघडण्यापूर्वीच घसरणीचे संकेत मिळत होते. त्याप्रमाणेच बीएसई सेन्सेक्स उघडताच 996.23 अंकांनी घसरले आणि 57 हजारांच्या खाली गेले.

Updated: Jan 27, 2022, 11:06 AM IST
Share Market | शेअर बाजारात घसरणीचे सत्र सुरूच; सेसेंक्स 1000 अंकांनी आदळला title=

मुंबई : शेअर बाजार उघडण्यापूर्वीच घसरणीचे संकेत मिळत होते. त्याप्रमाणेच बीएसई सेन्सेक्स उघडताच 996.23 अंकांनी घसरले आणि 57 हजारांच्या खाली गेले.

गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली विक्री थांबण्याचे नाव घेत नाहीये. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळेच भारतीय बाजारांमध्ये व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांनी खाली आला.

सलग 5 दिवस घसरणीनंतर मंगळवारी बाजाराला थोडा दिलासा मिळाला होता. बुधवारी प्रजासत्ताक दिनाच्या सुटीमुळे बाजारपेठ बंद होती.

या आठवड्यात यूएस सेंट्रल बँक फेडरल रिझर्व्हची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी संपली. या दोन दिवसीय बैठकीत फेडरल रिझर्व्हने मार्चमध्ये व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतला. ही घोषणा होताच जगभरातील बाजारपेठांमध्ये विक्री सुरू झाली. 

आज सर्व आशियाई बाजारपेठांमध्ये घसरण नोंदवली गेली. अमेरिकी फेडच्या निर्णयाचा परिणाम भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला.

बाजारात सध्या विक्रीचा दबाव आहे, BSE वर सर्व क्षेत्रातील शेअर्समध्ये घसरण दिसून आली आहे.