देशातील वृद्धांना मिळणार काम, सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत

केंद्र सरकार लवकच ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) काम मिळवून देणारी योजना आणणार 

Updated: Mar 18, 2021, 01:25 PM IST
देशातील वृद्धांना मिळणार काम, सरकार नवी योजना आणण्याच्या तयारीत title=

नवी दिल्ली : केंद्र सरकार लवकच ज्येष्ठ नागरिकांना (Senior Citizen) काम मिळवून देणारी योजना आणणार आहे. सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी यासंदर्भात राज्यसभेत घोषणा केली. या योजनेच्या माध्यमातून देशातील वृद्धांची आर्थिक स्थिती मजबूत करण्याचा सरकार प्रयत्न करेल. राज्यसभेत रामदास आठवले यांनी प्रश्नोत्तराच्या वेळी उत्तर देताना ही माहिती दिली. सेवानिवृत्त लोक आणि अन्य गरजू वृद्धांना काम देण्यासाठी ही योजना असेल.

देशातील वृद्धांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हे या योजनेचे उद्दीष्ट आहे.  देशात 600 पेक्षा जास्त निवारा घरे असून त्यातील 30,000 हून अधिक वयोवृद्ध आहेत. या निवारा गृहांमधील वृद्धांच्या पोषण आहाराचीही व्यवस्था केली आहे. येथे जेवणाबरोबर वृद्धांना आरोग्य सुविधा देखील पुरविल्या जातात असे आठवले म्हणाले.

२००० ग्रामपंचायती आणि २०० नगरपालिकादेखील वृद्धांना काम देण्याच्या योजनेत आणल्या जातील. या योजनेंतर्गत या नगरपालिका व ग्रामपंचायतींतर्गत येणाऱ्या 55,000 वृद्धांना काम उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

ही योजना आणखी मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने 39.6 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात 500 इतर नगरपालिका आणि 5,000 ग्रामपंचायतींना या योजनेंतर्गत आणले जाईल, असेही राज्यमंत्री म्हणाले. २०११ च्या जनगणनेनुसार देशात वृद्धांची संख्या १० कोटी 38 लाख आहे.

बुजुर्गों को मिलेगा काम, सरकार जल्द शुरू करेगी योजना

आतापर्यंत सरकारने देशात असा कोणताही सर्व्हे केला नाही, ज्यामुळे देशातील किती वयोवृद्ध लोकांना पोषण आवश्यक आहे याची माहिती उपलब्ध होऊ शकेल आठवले अशी माहिती आठवलेंनी राज्यसभेत दिली.