येत्या 2 वर्षात टोलनाकामुक्त भारत करणार, गडकरींची घोषणा

केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात महत्वाची घोषणा 

Updated: Mar 18, 2021, 12:29 PM IST
येत्या 2 वर्षात टोलनाकामुक्त भारत करणार, गडकरींची घोषणा  title=

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी देशभरातील टोलनाक्यांसंदर्भात महत्वाची घोषणा केलीय. येत्या काळात राष्ट्रीय महामार्गावर (National Highway) वाहन चालकांना वारंवार थांबण्याची गरज नाही. कारण येत्या 2 वर्षात राष्ट्रीय महामार्ग पूर्णपणे टोलनाकामुक्त होतील असे गडकरी म्हणाले.

एक नवी जीपीएस आधारित कलेक्शन यंत्रणा (GPS Collection System) आणण्यात येणार आहे. ही यंत्रणा सरकारच्या अंतिम टप्प्यात आहे. ही लागू झाल्यास वाहनांना टोलनाक्यावर थांबण्याची गरज नाही. यामुळे वाहनांची संख्या, ये-जा असा प्रवास देखील कळू शकणार आहे. टोलची रक्कम वाहनचालकाच्या अकाऊंटमधून पैसे कट करुन घेतली जाईल.

रशियन सरकारचे मदतीने भारत सरकारने जीपीएस आधारित प्रणाली आणली आहे. जी दोन वर्षात भारत टोलनाकामुक्त (TollNakafree India)करेल. यामुळे टोलनाक्यावर होणारी गर्दी कमी होईल. तसेच टोल नाक्यांच्या देखभालीवर होणार सरकारचा खर्च कमी होणार आहे. एका कार्यक्रमात गडकरींनी यासंदर्भात माहिती दिली.

विना हेल्मेट ट्रक चालवणाऱ्यास 1000 रुपयांचा दंड

आता सर्व कमर्शिअल वाहने ही ट्रॅकींग सिस्टिमसहीत येतील. जुन्या वाहनांमध्ये जीपीएस लावण्यासाठी सरकार योजना आखत आहे. जीपीएस टेक्नोलॉजीमुळे नॅशनल हायवे टोलची वसूली 5 वर्षात 1 लाख 34 हजार कोटींनी वाढू शकते. तसेच व्यवहारातही पारदर्शकता येईल.